दादापाटील राजळे महाविद्यालयात राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा संपन्न.

संघर्षनामा न्यूज़/पाथर्डी 

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.

यानिमित्त राज्यभरातून स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.  या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब घोरपडे हे उपस्थित होते. दादापाटील राजळे   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर अध्यक्षस्थानी होते. तसेच आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. राजू घोलप, प्रा. डॉ. जनार्दन नेहुल, प्रा. डॉ. किशोरकुमार गायकवाड, प्रा. रोहित अदलिंग, प्रा. अशोक देसाई, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. डॉ. ज्ञानदेव कांडेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल चौरपगार यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. आकांक्षा काळे यांनी केले.  प्रा. धनेश्वरी म्हस्के, प्रा. ज्योती तुपे यांनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले. पहिल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्राणी या गटामध्ये प्रथम क्रमांक मंदार साबळे अहमदनगर, द्वितीय क्रमांक नितीन केदारी अहमदनगर, तृतीय क्रमांक इशा लांडे. पक्षी या गटामध्ये प्रथम क्रमांक मुन्ना सोमानी आंबेजोगाई, द्वितीय क्रमांक अतिश भावसार पाथर्डी, तृतीय क्रमांक सुधींद्र सोनवणे  अहमदनगर. कीटक या गटामध्ये प्रथम क्रमांक गंगाराम लेंडवे रायगड, द्वितीय  क्रमांक तुषार उंडेगावकर नाशिक व तृतीय क्रमांक प्रियंका गवळी शेवगाव. निसर्ग या गटामध्ये प्रथम क्रमांक डॉ. अनिल साखरे नांदेड, द्वितीय क्रमांक ओंकार टारकसे अहमदनगर, तृतीय क्रमांक प्रियंका उनवणे आदिनाथनगर. वनस्पती या गटामध्ये प्रथम पारितोषिक प्रिया जाधव अमरावती, द्वितीय पारितोषिक भाग्यश्री वांडेकर आदिनाथनगर व तृतीय पारितोषिक प्रतीक्षा तायडे औरंगाबाद यांनी पटकावले. या स्पर्धेमध्ये  महाराष्ट्रातून विविध गटांत मधून ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

Related Post