संघर्षनामा न्यूज़।कर्जत
अजनुज प्रतिनिधी-शासन स्तरावर पात्र ३९६१प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, नैसर्गिक वाढीव तुकड्या यांना निधीसह करण्यात यावे आणि
आपला हक्काचा
पगार मिळावा यासाठी अघोषित शिक्षक महासंघाचे प्रा. अंजली गाढे, प्रा. भाग्यश्री ढोणे, प्रा. दिपक आमले बुलढाणा राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या समवेत आपल्या अध्यक्षतेखाली होवू घातलेली बैठक लवकरात लवकर घेवून आमचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा आमच्या हक्काच्या पगारासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करीत आहोत. गेली २० वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. जो शिक्षक बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला कायमचे मिटवा. हक्काचा पगार मिळावा यासाठी विदर्भातून पंधरा पंधरा तासांचा प्रवास करून आंदोलनात सहभागी होतो. गेली १५ ते२० वर्ष झाली स्वखर्चाने शाळेवर जाणे-येणे करून एक रुपया दमडीचा पगार न मिळाल्याने आमची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची झाली आहे याच बिघडलेल्या मानसिकतेत आमच्या जवळपास ६० शिक्षक बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आई वडील पोराचा पगार आज मिळेल उद्या मिळेल या अपेक्षेने शेवटी जगाचा निरोप घेतला, अनेक शिक्षक बांधवांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
अनेक शिक्षक बांधव घर चालवण्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी अतिशय हलक्या दर्जाची, मेहनतीची कामे करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून या होणाऱ्या बैठकीत आपण पोटतिडकीने शिक्षकांचा प्रश्न सोडवाल अशी अपेक्षा आहे. यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले तुमचा प्रश्न पुर्णतः माहित आहे काल, आज, गेल्या आठवड्यामध्ये अनेक वेळा सभागृहात तुमच्या विषयावर चर्चा झालेली आहे. तुम्हाला न्याय देण्याची भूमिका मांडली जाईल असे त्यांनी सांगितले.