संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदे
दि.१३ जून २०२५
प्रतिनिधी,
पंचायत समिती श्रीगोंदा समग्र शिक्षा अभियानांतर्गत गटशिक्षण अधिकारी श्रीमती कुसुमकुमारी बापू कानडी यांचे हस्ते चोराची वाडी जि.प.प्रा.शाळेतील पाचवीतील अपंग विद्यार्थिनी कु. संस्कृती बाजीराव चव्हाण हिस सायकलचे वितरण करण्यात आले.
कु.संस्कृती हि विकलांग असुन ती दूसरी इयत्तेत शिकत असताना ती डोक्यावर पडल्याने मेंदुला मार लागला होता त्यामुळे मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागली तेंव्हा पासून तिला चालता येत नाही पालकांना तिला शाळेत ने आण करणे जिकीरीचे व कष्टाचे असल्याने चोराची वाडी चे सरपंच संतोष शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री बापुराव खामकर, वर्ग शिक्षिका शितल बोरुडे ,सोनाली अकोलकर ,राजश्री जाधव विशेष शिक्षिका यांनी दिव्यांग शिक्षा अभियानांतर्गत गटशिक्षण अधिकारी श्रीमती कुसुमकुमारी बापू कानडी यांचे कडे पाठपुरावा करुन संस्कृतीस सायकल मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले.
शुक्रवार दिनांक १३जुन २०२५ रोजी गटशिक्षणाधिकारी श्रीमती कुसुमकुमारी बापू कानडी यांचे हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.यावेळी संस्कृती ची आई, चोराची वाडी चे सरपंच संतोष शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे राजेंद्र पोकळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री माधव बनसुडे, सिराज शेख, दिपचंद वायदंडे, बापू उदमले, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.