संघर्षनामा वृत्तसेवा lकाष्टी
दि. 8 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
कोरोणा काळात प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्व समजले आहे. तेव्हा पर्यावणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन झाडे लावून झाडे जगविली पाहिजे. झाडाचे महत्व बाहेरील देशांना समजेले म्हणून पानसरे नर्सरीतून जगातील संव्विस देशात हि नर्सरी आपली विविध प्रकारची झाडे एक्सपोर्ट करुण प्रचार आणि प्रसार करते.त्यामुळे हायटेक पानसरे नर्सरीचा आदर्श घेण्यासारखा आहे. आपल्याही राज्यातील प्रत्येक रस्त्यावर झाडे पाहिजे असे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी बोलताना सांगितले.
दि.5 रोजी श्रीगोंदा तालुक्यातील आपल्या विविध कार्यक्रमासाठी आलेले मंत्री नितेश राणे यांनी आपला वेळ काढून काष्टी येथील 1988 साली महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेले डी.वाय.पानसरे यांच्या निवासस्थानी जावून तेथील पसंतीस एकरात इस्रायल तंत्रज्ञान वापरुण उभारलेल्या पानसरे नर्सरीत जावून विविध झाडांची मंत्री राणे यांनी पहाणी केली.
यावेळी मंत्री राणे म्हणाले केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी देशासह राज्यात सुंदर आणि अनेक वर्षे टिकतील असे मजबूत सिमेंटचे रस्ते तयार केले आहेत, परंतु रस्ता तयार करताना जुनी झाडे तोडली,पण नवीन झाडे रस्त्याच्या कडेने लावली नाहीत. आपल्या भागातील मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावण्याचा आम्ही प्रथम संकल्प केला आहे. हे काम पानसरे नर्सरीने करावे असेही ते म्हणाले. कारण राज्यातील विविध शहरातील रस्त्यावर लावलेल्या नव्या व जुन्या झाडाचे पानसरे यांनी केलेले काम सुंदर आहे. तसेच जुनी झाडे काढून पुन्हा दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठी लागणारि हायटेक तंत्रज्ञान मशीनरी ठेवून झाडे न तोडता काढून ईतर ठिकाणी लावणे सोपे झाले आहे. गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन हरितक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी शासन म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करु म्हणून झाडे लावा झाडे जगवा हि मोहिम फक्त फोटो काढण्यासाठी व देखावा करण्यासाठी नको तर यावर प्रत्यक्ष कृती झालि पाहिजे.
यासाठी राज्यातील प्रत्येक नवीन झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावून पर्यावणाचा समतोल ठेवला पाहिजे यासाठी शासकीय अधिकारी यांनी जनजागृती करुण पुढाकार घ्यावा असे राणे म्हणाले.
यावेळी आमदार विक्रम पाचपुते, प्रताप पाचपुते, आप्पासाहेब हिरवे,मिलिंद दरेकर यांंच्यासह मान्यवर हजर होते.
नर्सरीचे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी संपूर्ण नर्सरीचि माहिती देवून मान्यवरांचा सत्कार केला. तर संचालक संतोष पानसरे यांनी सर्वाचे आभार मानले.
शेवटी राणेंनी पानसरे यांच्या निवासस्थानी थांबून बाजरीची भाकरी, वाग्यांचे भरित,हिरव्या मिरचीचा ठेचा घेत घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. आणि पुणे जिल्ह्यातील पुढील कार्यक्रमाला रवाना झाले.
फोटो: काष्टी येथे पानसरे नर्सरीत भेट देवून पहाणी करताना मंत्री नितेश राणे, आमदार विक्रम पाचपुते बाळासाहेब पानसरे, संतोष पानसरे अदि (छाया: दत्ता पाचपुते )