संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . २७ ऑगस्ट २०२६
प्रतिनिधी,
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत.
या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग , मंत्रालय, मुंबई यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:
? माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
*अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन* -
जर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये असून पूर परिस्थितीमुळे अडकले असतील किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक यांनी वरील लिंकवर सविस्तर माहिती भरावी.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे संपर्क साधून नेपाळमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची माहिती द्यावी. प्रशासनाला संबंधित व्यक्तींची माहिती देताना पूर्ण नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/ हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबियांचा संपर्क क्रमांक इ. महिती द्यावी.
अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर
संपर्क क्रमांक -1077 (टोल फ्री)
0241-2323844
0241-2356940