संघर्षनामा वृत्तसेवा l नगर
दि.३०ऑगस्ट २०२४
प्रतिनिधी,
संत वामनभाऊ व संत भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने राज्यस्तरीय द्वितीय वंजारी समाज मराठी साहित्य संमेलन गंगा लॉन, निर्मलनगर ,अहमदनगर येथे संपन्न झाले.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची गाथा व ज्ञानेश्वरी धर्मग्रंथाची परिसरात प्रभात फेरी काढून मिरवणूक काढण्यात आली. भक्तिरसात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात कऱण्यात आली.
यावेळी विविध सैनिक संघटनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह देऊन आ.संग्राम भैया जगताप, अक्षय कर्डिले व राज्यातून साहित्य क्षेत्रामधून उपस्थित झालेल्या मान्यवरांच्या हस्ते येथे सन्मान करण्यात आला.
राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य क्षेत्रामध्ये लेखक,कवी, कलाक्षेत्रातील विचारवंतांनी आपल्या अनमोल वाणीतून विचार व्यक्त केले. युवानेते अक्षय कर्डिले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयाचा उजळा दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर चे लोकप्रिय युवा आ.संग्राम भैया यांनी सांगितले की अहमदनगर संतांची भूमी आहे. व त्याचा वारसा पुढे चालत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. याच माध्यमातून आपण करत असलेले प्रोत्साहानात्मक कार्यक्रमास मी नेहमीच आपल्या बरोबर उभा आहे. इतर जिल्ह्यामधून समाजाचे नगर शहरामध्ये उच्च शिक्षण साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याची सुविधेसाठी आपणाला याच परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाईल. असे आश्वासन दिले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वंजारी समाज अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अर्जुन वायभासे, गणेश खाडे व राजकुमार आघाव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर आंधळे यांनी केले.
यावेळी जयहिंद माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष मेजर नीलकंठ उल्हारे, जयहिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, प्रहारचे विनोद परदेशी, गोरख पालवे ,लहू सुलाखे ,अनिल सत्रे ,रघुनाथ दांगट, मारुती ताकपेरे,सोन्याबापु शिंदे, कुशल घुले, बाबासाहेब आंधळे, युनूस टेंगे,अनिल गर्जे, बाबासाहेब कर्पे,अशोक साबळे मनोज रणसिंग हे उपस्थित होते हजारो समाज बांधवांच्या समवेत पत्रकार नगर जिल्ह्यामधील अनेक सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . सर्वांचे आभार जिल्हा अध्यक्ष पै.अर्जुन वायभासे यांनी मानले.