राज्यव्यापी संपात शिक्षकेतर महासंघ सहभागी होणार-पाराजी मोरे

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२७ ऑगस्ट,२०२४

  लिंपणगाव( प्रतिनिधी )- 29 ऑगस्ट 2024 रोजी च्या शासकीय; निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्य संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपामध्ये व्हावे असे; आवाहन राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्य महासचिव पाराजी मोरे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीने सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी; या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी दिनांक 29 ऑगस्ट 20२४ रोजी संपाची हाक दिलेली आहे. प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद सर्व मागण्यांबरोबरच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना १२/ 24 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक १ ऑक्टोबर 2006 पासून पूर्व लक्षी प्रभावाने लागू करावी या मागणीचा समावेश करण्याबाबत राज्य शिक्षकेतर महासंघाने आग्रह धरलेला होता. याबाबत प्रधान सचिव वित्त विभाग यांची वेळ निश्चित करून चर्चा घडवून मार्ग काढण्याबाबत दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी महासंघास आश्वासित केलेले आहे. पुढे या निवेदनात जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे यांनी म्हटले आहे की; महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघ हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना समन्वय समितीचा अधिकृत सदस्य आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून काढलेल्या संपामध्ये शिक्षकेतर महासंघाने सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे या निवेदनात महासचिव पाराजी मोरे यांनी आणखी म्हटले आहे की; राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील अध्यक्ष; सचिव व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपात सक्रिय सहभाग घेऊन शाळेतील शिक्षकांचे निवेदनासोबत आपले निवेदन सादर करावीत. संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी; संपूर्ण संप शांततेच्या मार्गाने पार पाडावा. व सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यास शासनास भाग पाडावे असे आवाहन राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्य अध्यक्ष वाल्मीक सुराशे; कार्याध्यक्ष केशव पाटील व महासचिव शिक्षकेतर महासंघाचे  पाराजी मोरे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण जिल्हा शिक्षकेतर महासंघाचे ज्यष्ठ मार्गदर्शक समशेर भाई पठाण यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Related Post