संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदा
दि. ३ऑगस्ट २०२४
श्रीगोंदा प्रतिनिधी,
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती उत्सव समिती ससाणेनगर सिद्धार्थनगरच्या वतीने उत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला सकाळी विक्रमसिंह पाचपुते,राजेंद्र दादा नागवडे,तहसीलदार वाघमारे मॅडम,पी आय भोसले साहेब ,सरपंच ऋषिकेश शेलार, बापू माने,नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या हस्ते अभिवादन व ध्वजारोहण करण्यात आले.तसेच श्रीगोंदा शहरात उत्कृष्ट मनमोहक झांजपथक लेझिमपथक सह मिरवणूक काढण्यात आली..दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमानिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष अँड संभाजीआप्पा बोरुडे यांचे जाहीर व्याख्यान झाले..शालेय मुलांना वह्या पुस्तके वाटप कार्यक्रम करून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सायंकाळी लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते.स्मारकात वृक्षारोपण करण्यात आले.सायंकाळी या अभिवादनासाठी मा.आ.राहुल दादा जगताप,प्रताप पाचपुते, साजन पाचपुते,यांनी भेट देऊन लेजर शोचा आनंद घेतला.
शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ गायत्री शेलार फेम पिचली माझी बांगडी,आझाद केलं तुला,डॉ अण्णाभाऊ साठे व लहुजी समाजप्रबोधनपर गीतांचा स्वरगंध कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे सायंकाळी 7 वाजता संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती ससाणेनगर सिद्धार्थनगर अध्यक्ष मा.नगरसेवक अनिल ससाणे,उपाध्यक्ष शिवाआप्पा घोडके,सचिव संदीपभाऊ उमाप,नितीन ससाणे, सल्लागार किशोर दादा नेटके,खजिनदार लाला ससाणे,,राजू ससाणे,गणेश ससाणे, प्रा.संदिप सर,सचिन पाटोळे,कुणाल शिरवाळे, तृषाल ससाणे,गोरख घोडके यांनी केले आहे.