तांदळी दुमाला येथे लो.आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे 

दि.१ ऑगस्ट २०२४

प्रतिनिधी,

जगतविख्यात साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती तांदळी ग्रामपंचायत व तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.

गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8:00 वाजता ग्रामपंचायत तांदळी दुमाला ता. श्रीगोंदा च्या वतीने , लोकनियुक्त सरपंच संजयआण्णा निगडे, उपसरपंच कृष्णा धावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण काळे वाघ ,आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नर्सिंग भोस ,गा.प. सदस्य संतोष हराळ, ग्रा.प .सदस्य झुंबर खुरांगे ,सुभाष मांढरे ,राजू पाटील भोस ,कचरे मेजर, हनुमंत काळेवाघ, काशिनाथ हराळ ,रवींद्र सकट, भाऊ बोरुडे ,ग्रामपंचायत कर्मचारी महादेव शेळके ,जालिंदर तरटे, आदि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली .आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यावर प्रकाश टाकताना अण्णाभाऊंचे साहित्य हे वास्तववादी साहित्य असून  कामगार कष्टकरी शेतकरी गोरगरीब वेदना व व्यथा त्यांच्या साहित्यातून दिसून येत आहेत म्हणून अण्णा भाऊंनी सांगितले होते पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी ,शेतकरी कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे . तसेच तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक साळवे सर व सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य संदीप रोडे  यांनी अण्णा भाऊंचा साहित्यावर प्रकाश टाकताना अण्णाभाऊंचे दीड दिवस घेतलेले शिक्षण आणि त्या माध्यमातून तयार झालेले साहित्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील असे सांगितले 

यावेळी बोलताना आधुनिक लहूजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अण्णा भाऊंची लेखणी उपेक्षित वंचित घटकांसाठी अविरत संघर्ष करत राहिली आणि त्यांच्या साहित्यातून चंद्र सूर्य असेपर्यंत प्रेरणा मिळतच राहील त्यामूळे प्रत्येकाने त्यांच्या सळसळत्या लेखणीतून साकारलेला फकिरा एकदा अवश्य वाचावा असे ते म्हणाले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, कर्मचारी विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांच्या वतीने अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

Related Post