संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे
दि.३१जुलै २०२४
लिंपणगाव प्रतिनिधी,
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल चे क्रीडा शिक्षक प्रा.कैलास ढवळे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे पार पडला.सोहळ्याला जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे, राज्य क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती अध्यक्ष बापूराव गायकवाड आणि माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे हे मान्यवर उपस्थित होते.
श्री.ढवळे गेल्या १५ वर्षांपासून नागवडे इंग्लिश मिडीयम याठिकाणी क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत.
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक यांनी श्री कैलास ढवळे यांचे अभिनंदन केले आहे.