शिवाजीराव नागवडे विद्यालयाच्या प्राचार्य पदी बापूराव भिसे यांना पदोन्नती

                             

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.१८ जुलै २०२४

    लिंपणगाव प्रतिनिधी (नंदकुमार कुरुमकर )श्रीगोंदा तालुक्यातील ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक  श्री. बापूराव भिसे सर यांची प्राचार्य पदी निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल तीस वर्षे शिक्षक म्हणून अत्यंत जिद्द ,सचोटी ,नियोजन आणि प्रामाणिकपणे काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटलेला आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित असणारे श्री. बापूराव भिसे सर यांची प्राचार्य पदी निवड झाल्यामुळे संस्थेचे सचिव सन्माननीय राजेंद्रदादा नागवडे ,संस्थेचे अध्यक्ष  अनुराधाताई नागवडे तसेच निरिक्षक श्री. बी. के लगड सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्याचप्रमाणे  संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी आणि  वांगदरी गावातील जेष्ठ  व्यक्तींनी त्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Post