डॉ.सुजय विखे यांना राज्यसभेवर घेण्याची सिद्धेश्वर देशमुख यांची मागणी.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.१३जून २०२४

संपादकीय लेखणीतून...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण मतदार संघा मधून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला.


मात्र देशांमध्ये एनडीएच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रे पुन्हा सांभाळली कारण देशात भाजपाच प्रबळ ठरला...


 आगामी विधानसभा समीप म्हणजेच काही महिन्यावर आहेत. गेल्या पंचवार्षिक मध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांनी भरघोस कामे केली,आजही प्रत्येक ग्रामपंचायतला त्यांनी वितरीत केलेल्या निधीतून विकास कामे होत आहेत आणि विविध विकास कामे मंजूर आहेत, हे का होऊ शकलं त्याचं कारण असं की, केंद्रातील सत्ता आणि सत्ताधारी खासदार या सूत्रामुळे डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी विकास कामांचा ठसा उमटवला...


 पण आजचे चित्र वेगळे आहे विरोधकांनी केलेली दिशाभुल यामुळे डॉक्टर सुजय विखेंना अल्पमतांनी पराभवाचा सामना करावा लागला .

या पराभवाची तमा न बाळगता डॉक्टर विखेंनी  मनोमिलन मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना उभारी दिलीआणि आगामी काळासाठी जोमाने कामाला लागण्याचा निर्धार केला.

 या बाबी जरी वास्तवदर्शी असल्या तरी मागील केलेली विकास कामे, मंजूर कामे यावरचे नियंत्रण आणि पुढील विकासात्मक अजेंडा याचा समन्वय साधायचा असेल तर सत्ताधारी खासदार असणं गरजेचं आहे, हीच आग्रहाची भूमिका मांडत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी त्यांचे कट्टर समर्थक तथा श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धेश्वरराव देशमुख यांनी केली आहे.


 जसं मला मताधिक्य वाढवता आलं तसं प्रत्येक कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले असते तर ही वेळच आली नसती असे ते म्हणाले..


 अहमदनगर जिल्ह्याचा विकासात्मक लेखा जोखा मांडताना ते म्हणाले केंद्रामध्ये किंवा राज्यांमध्ये सत्तांतर होत असताना कधि राज्य नेतृत्वापेक्षा विरोधी आमदार किंवा कधी केंद्र नेतृत्वापेक्षा विरोधी खासदार अशी समीकरणे बऱ्यापैकी आपल्या वाटेला आली त्यामुळे ऐतिहासिक अहमदनगर शहर किंवा तालुके विकासापासून वंचित राहिले,शेजारील पुणे बहुविकसित झाले तर लगतच्या संभाजीनगर चा चेहरा मोहरा बदलला पण अहमदनगर जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही ही सल जनतेच्या मनात कायम होती त्यामुळे दिवंगत खासदार तथा मा. केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना जनतेने स्वीकारले


 केंद्रातील सत्ता पक्षाचा खासदार असल्यामुळे त्यांनी निधी वितरित करताना खासदार काय असतो? त्याला निधी किती असतो ?त्याने काम कसं करावं याचे थेट समीकरण जुळवून नगर दक्षिणच्या विकासाची मोट बांधली दुर्दैवाने कोरोनामुळे आपणाला या कर्तुत्वान खासदाराला मुकावे लागले.

 त्यांनी नगरचा विकासात्मक चेहरा बदलण्यासाठी जोमाने पाठपुरावा केला होता त्यामध्ये नगरच्या उड्डाणपुलाची मंजुरी आली होती खरंतर विविध विकासाची नांदी सुरू असताना पुढील पाठपुरावा करण्यासाठी दिवंगत खासदार गांधी नसल्याचे शल्य नगरकरांनी अनुभवलं.. 


कालांतराने २०१९ ची लोकसभा निवडणूक लागली आणि राजकारण व समाजकारण याचा समन्वय साधणाऱ्या विखे परिवारातील उच्चशिक्षित नॅरो सर्जन डॉक्टर विखे पाटील हे उमदे नेतृत्व पुढे आले.

 २०२९च्या लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचा तरुण खासदार म्हणून  नगर दक्षिणने विक्रम मतांनी त्यांना निवडून दिले, दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी रचलेला विकासाचा पांयडा नवनिर्वाचित खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी जोमाने सावरला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे गतिमान झाली. यामध्ये नगरचा उड्डाणपूल, नगर करमाळा नेत्र दीपक महामार्ग असे अनेक उल्लेख करता येतील हे कसं शक्य झालं तर केंद्रातील  केंद्रातील सरकार आणि अहमदनगर दक्षिणचा खासदार हे एकाच पक्षाचे होते हे विसरून चालणार नाही... 


आज मात्र परिस्थिती वेगळी आहे काही हजार मतांच्या जोरावर खासदार इंडीया आघडीचा आहेआणि केंद्रस्थानी एन डी ए च सरकार आहे त्यामुळे अहमदनगर दक्षिणचा कसा विकास होणार माहित नाही...

 पण एकूण झालेल्या मतदाना पैकी लमसम २९०००मतांची आघाडी  वगळता डॉ.विखेंना तोडीसतोड मतदान झाले आहे. आपण हक्काचे मतदार आहोत मग आपलं काय? आपल्या विकासाचे काय? शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांचे काय? आपल्या न्याय हक्कांचं काय असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत...

कारण देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा आरुढ झालेले नरेंद्र मोदींनी दमदार निर्णयाला सुरुवात केली आहे या विकासाच्या धोरणांची गंगा आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी संसद गाजवलेलं संसद पट्टू डॉक्टर विखे पाटील राज्यसभेच्या माध्यमातुन पुन्हा आपल्याला खासदार पाहिजेत...


नगर दक्षिण मध्ये केलेली विकास कामे, मंजूर कामे याचा समन्वय साधता आगामी विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्व जागा ताकतीनीशी निवडून आणण्यासाठी विखे फॅक्टर महत्त्वाची जबाबदारी बजावेल असा मला ठाम विश्वास असून ही मागणी माझी वैयक्तिक जरी असली तरी आपल्या सर्वांच्या आणि मतदारसंघाच्या हिताची आहे त्यासाठी सुज्ञ कार्यकर्त्यांनी सार्वजनिक स्वरूपाची मागणी करून पक्षश्रेष्ठीकडे डॉ.सुजय विखेंना राज्य सभेवर घेण्यासाठी आग्रह धरावा असे आवाहन माजी सरपंच सिद्धेश्वरराव देशमुख यांनी संघर्षनामा च्या माध्यमातुन केले आहे.

Related Post