नागवडे इंग्लिश मीडियमच्या प्रज्वल ढवळेचा गोल्डन पंच .

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२६मे २०२४

लिंमणगाव प्रतिनीधी,

२२ ते २६ मे दरम्यान श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय किकबॉक्सींग स्पर्धेमध्ये शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या इ.९ वी मध्ये शिकणाऱ्या प्रज्वल ढवळे या खेळाडूने लाईट कॉन्टॅक्ट आणि पॉईंट फाईट या दोन्ही प्रकारांमध्ये ६९ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. 


तसेच १५ वर्षे वयोगटात ६५ किलो वजन गटामध्ये शर्वरी गोलांडे हिने आणि जय शेलार याने ६९ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. तर सई सुपेकर या विद्यार्थिनीने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.स्पर्धेमध्ये २७ राज्यांतील तब्बल १८०० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता.


यशस्वी खेळाडू संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नियमितपणे सराव करतात.त्यांना मास्टर जयेश आनंदकर तसेच महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग संघाचे कोच सिद्धेश आनंदकर यांच्यासह क्रीडाशिक्षक कैलास ढवळे, रोहित दानवे, राजश्री नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले.


या सुवर्ण कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधा ताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Post