आ.रोहीत पवार यांची लोणकढी थाप -अशोक खेडकर

संघर्षनामा न्युज l कर्जत

दि.२४मे २०२४

प्रतिनिधी, उज्वला उल्हारे 

     आ .रोहीत पवार हे कोणत्याही गोष्टिचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच धडपडत असतात . न केलेल्या कामांचे ही श्रेय घेण्यासाठी सोशल मिडिया, प्रसिद्धी माध्यमे यामधून ते नेहमीच अशा बातम्या प्रसिद्धीस देत असतात . . .

     अहमदनगर करमाळा रस्त्यावरील गावांना बायपास झालेला आहे अशा गावांना माझ्या प्रयत्नातून अंदाजे २२ कोटी निधी मी आणला अशी लोणकढी थाप सध्या ते मतदार संघात देत फिरत आहेत . खरचं त्यांनी काम मार्गी लावले असते तर हरकत नव्हती परंतु दूरान्वये ही या कामाशी संबंध नसताना श्रेयवादासाठी कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी धादांत खोटे बोलत आहेत . जनतेला वस्तुस्थितीचा विपर्यास करून सांगत आहेत . असे प्रतिपादन माजी जि . परिषद सदस्य श्री अशोक खेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे . त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे श्रेय घेण्यातील आ .रोहीत पवार यांचा धादांत खोटारडेपणा उघड केला आहे . त्यांनी खालील प्रमाणे माहिती दिली .

                       नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात NHAI च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांचे म्हणणे आहे कि राष्ट्रीय महामार्गाला बायपास झालेल्या गावांना ते एका वेळेस रस्ता दुरुस्त करून देतात असा त्यांचा धोरणात्मक निर्णय ( पॉलिसी )ठरलेला आहे त्या प्रमाणे आम्ही त्या रस्त्यांना निधी उपलब्ध करतो . एन . एच . ए .आय . ने ध्रुव कन्सलटनसी कंपनी नेमलेली आहे त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे त्याप्रमाणे आम्हाला दिल्ली ऑफिस मधून परवानगी मिळालेली आहे तसे पत्र आम्ही ध्रुव कन्सल्टनसी ला दिलेले आहे . . .

  हि वस्तुस्थिती आहे आता आपण आमदार रोहीत पवारांची श्रेयवादाची धडपड कशी चालू आहे ते पाहू ..आमदार आ . रोहीत दादा पवार गोलमाल करण्यात हुशार आहेत . त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून दोन पत्र प्रसिद्धीस दिली आहेत त्यामध्ये एक पत्र एनएचआयए ने ध्रुव कन्सल्टन्सीला दिलेले आहे कि जेणेकरून निविदा मागवून घ्याव्यात त्यामध्ये कॉम्युटर जनरेटेड नंबर आहे .E office coputer No 218635 note no 58 कि जो ध्रुव कन्सल्टनसीने दिल्ली ऑफिस ला पाठवलेलं प्रोपोजल चा आहे . आताही ध्रुव कन्स्लटट ला त्या रेफर नबरने एनएचआयए ने पत्र दिले आहे . . . . .

  इथेच आमदार महोदयानी हुशारी करत तो इ - कॉम्युटर नं स्वतःच्या पत्रात घातलेला आहे अर्थात त्याचे काही कारणही नाही पण जसे काय एनएचआयए ला मीच प्रोपोजल दिले आहे असे वाटावे म्हणून हि हुशारी .....

 हा तांत्रिक तपशील मुद्दामहून दिला आहे कारण आ .राम शिंदे आणि खा डॉ सुजय विखे पाटील यांना मिरजगावचे कार्यकर्ते भेटले आणि त्यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी त्यांच्याकडे केली त्यांनी तत्काळ एनएचआयए च्या अधिकार्‍याना फोनवरून सूचना दिल्या त्याप्रमाणे कोकणगाव ते मिरजगाव या रस्त्याची दुरुस्ती ही झाली . बायपास झालेल्या गावांच्या रस्त्यांना हि दुरुस्ती करण्याची तरतूद सुद्धा सदरहू रस्ता बनवणाऱ्या एजन्सी कडे असते . साधारणतः १५ मार्च २०२४ ची हि घटना आहे . आता आमदार महोदय म्हणतात मी प्रयत्न केले पण ते सोयीस्कर पणे विसरतात कि इथे भाजपचे खासदार आहेत . तुम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहात तुमच्या पत्राने काम होत असेल तर मग खासदारांना पत्र देता येत नाहीत का? खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांच्या मुळेच हा रस्ता मुदतीपूर्व वेळेत तयार झाला आहे आणि तुम्ही म्हणता मी पत्र दिले? श्रेयवादासाठी हि केविलवाणी धडपड योग्य नाही . अहमदनगर करमाळा या रस्त्याचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हा आमदार आणि तत्कालीन पालकमंत्री अहमदनगर श्री राम शिंदे साहेब यांच्या काळात झालेला त्यानंतर अहमदनगर (दक्षिण ) चे खा . डॉ सुजय विखे पाटील यांनी त्यास गती देऊन हा मार्गी लावला . भूसंपादन साठी त्यांनी अधिकारी, शेतकरी यांच्या समवेत वारंवार बैठका घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला . रस्त्याचे मुदतीपूर्वी काम झाले आहे यामध्ये आमदार महोदयांचा काडीचाही सहभाग नाही असला तर बगलबच्च्याचे वाहने रस्त्यासाठी लावण्यात असेल? ...

                        आमदार रोहीत दादा पवार साहेब आपण स्वतःला खूप हुशार समजता परंतु कर्जत जामखेड मधील जनता गरीब आहे परंतु स्वाभिमानी आहे त्यांना मूर्ख समजण्याची चूकी तुम्ही करू नका . मविआ सरकारच्या काळात विकास निधी आणि विकास प्रकल्प आणण्यात तुम्हाला अपयश आलेलं आहे . तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तुम्ही एमआयडीसी मंजुरी मिळवली म्हणत गाजावाजा केला परंतु सदोष प्रस्तावामुळे तुम्ही एमआयडीसी ला तत्वतः मान्यता सुद्धा मिळवू शकला नाहीत . ते काम आ .राम शिंदे साहेबांनी मार्गी लावले अगदी अडीच महिन्याच्या विक्रमी कालावधीत तर तुम्ही त्या ठिकाणीही न्यायालयात जाण्याची भाषा करता .. तुम्ही विकास कामांना विरोध करता आणि श्रेय घेण्यासाठी मात्र नको त्या क्लृप्त्या लढवता पण असं फुकटचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही . कर्जत जामखेड मधील जनता सजग आहे आता तुमच्या भूलभुलैय्या अणि सोशल मिडियावरील नेत्यांबरोबरच्या फोटो सेशनला भूलणार नाही . फोटोसेशन आणि इव्हेन्ट करून शाश्वत विकास होत नसतो . रस्त्याचे श्रेय घ्यायला जाताल तर रस्त्यावर यावे लागेल असा सज्जड इशारा ही श्री अशोक खेडकर यांनी यावेळी बोलताना दिला .

Related Post