मुलगी आणि आई चांगल्या मैत्रीणी बना-गितांजली ताई शेळके

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२९ जानेवारी २०२६

निघोज प्रतिनिधी ,

ग्रामीण भागात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना युवतींनी आपल्या आईवडिलांचा विश्वास सार्थकी लावत असताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलगी आणि आई चांगल्या मैत्रीणी बना. आणि सोशल मीडियाचा वापर स्वत:च्या शिक्षणासाठी करा असा सल्ला जीएस महानगर बॅकेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली ताई शेळके यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींना दिला. 

     निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात आई माझ्या महाविद्यालयात हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस, के, आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य मनिषा गाडीलकर, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, राज्य पत्रकार संघाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, पत्रकार जयदीप कारखिले, पत्रकार सागर आतकर, पत्रकार आनंद भुकन, पत्रकार सलीमभाई हावलदार, पत्रकार संपत वैरागर, जिल्हा सहकारी बॅकेचे तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, मुंबई बॅकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष खणकर,श्रीकांत खोडदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

 यावेळी शेळके म्हणाल्या की, ग्रामीण भागात पुर्वी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय कमी असल्याने मुलींचे लवकर लग्न करून दिली जात होती. त्यामुळे शिक्षणाची आवड असतानाही अनेक मुलींना लग्नामुळे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे साक्षरता कमी झाली. मात्र आता ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलींनी आधी शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे रहावे. आज शिक्षणाला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रतिकुल परीस्थितीला सामोरे जाताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जीवनातील उच्च धेय गाठा. यावेळी प्राचार्य एस. के. आहेर यांनी महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रास्ताविक उपप्राचार्य मनिषा गाडीलकर यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. निलिमा घुले यांनी केले तर प्रा. दुर्गा रायकर यांनी आभार मानले. 

                    चौकट

या कार्यक्रमात उपस्थित माता अन् विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अतिशय भावनिक होत उपस्थित मातांनी आपल्या मुलींना पाठबळ दिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जीवनात उंच भरारी घ्या. आपल्या माता तुमच्या पाठीशी उभे राहतील . तसेच प्रत्येक मुलींनी आपल्या आईवडिलांची काठी व्हा

असा संदेश या कार्यक्रमातुन देण्यात आला

            फोटो ओळी

मुलिकादेवी महाविद्यालयात आई माझ्या महाविद्यालयात या उपक्रमात बोलताना जीएस महानगर बॅकेच्या अध्यक्षा गीतांजली ताई शेळके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

Related Post