संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१७ ऑक्टोबर २०२५
नगर प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री आणि नगर-राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६५) यांचे आज (दि. १७ ऑक्टोबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कामसू, जनसंपर्कक्षम आणि लोकांमध्ये सदैव राहणारा नेता म्हणून आमदार कर्डिले यांनी आपल्या कार्यकाळात ठसा उमटवला होता.
नगर जिल्ह्यातील जनतेशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने कामाचा आमदार म्हणून ओळख असलेल्या या नेत्याच्या जाण्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता बुऱ्हानगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आमदार कर्डिले हे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तर अक्षय कर्डिले यांचे वडील होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कर्डिले कुटुंबीयांसह संपूर्ण नगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.