संघर्षनामा वृत्तसेवा ।श्रीगोंदा
दि. १४ ऑक्टोबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी ,
येळपणा जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून, या गटातून महाविकास आघाडी कडून श्रीनिवास श्रीधर नाईक यांनी उमेदवारीची तयारी दर्शविली आहे. नाईक हे शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खासदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, वरिष्ठ नेते बाबासाहेब भोस, तसेच तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या श्रीनिवास नाईक यांनी येळपणा जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये विकासकामांमध्ये पुढाकार घेतला आहे.
रस्ते, पूल, बंधारे, वीज विभागातील डीपी मदत, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून नागरिकांना मदत मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
मंत्रालयातून विविध विकासकामांना गती मिळवून देण्याचे त्यांच्या प्रयत्नांमुळे येळपणा परिसरात त्यांची विश्वासार्ह छबी निर्माण झाली आहे.
जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगताना श्रीनिवास नाईक यांनी संवादात सांगितले की,
मी २० वर्षांपूर्वीच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ज्येष्ठ नेते अण्णा पाटील पवार यांच्या साठी मी त्यावेळी थांबलो. आज मात्र सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मी शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य माणूस आहे; जनतेने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाठिंबा स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि युवकांमध्ये नाईक यांच्या उमेदवारीसाठी उत्साह आणि विश्वासाचे वातावरण आहे. अनेक गावांमध्ये बैठकींची मालिका सुरू असून, कार्यकर्त्यांकडून नाईक यांना सक्रिय पाठिंबा मिळत आहे.
येळपणा जिल्हा परिषद गटात श्रीनिवास नाईक यांचे नाव सध्या चर्चेत असून, आगामी काही दिवसांत त्यांची उमेदवारी औपचारिकपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.