संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा
दि.३ सप्टेंबर २०२५
(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०. ०० वाजता माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेह मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ.महादेव जरे यांनी केले आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच 1982 पासूनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलेले आहे. तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात जुने अनुभव कथन करून त्यांच्या जीवन प्रवासातील अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांना शेअर करावेत.तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी भावी योजनांवर चर्चा घडवून आणावी. महाविद्यालयाचे आजी- माजी प्राध्यापक व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद या मेळाव्यामुळे निर्माण व्हायला हवा. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले आहे .