दि १ऑक्टोंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी ,
श्रीगोंदा तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित महिलेची वारंवार फसवणूक करत तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अमोल कमलाकर धर्माधिकारी (रा. रविवार पेठ, श्रीगोंदा) याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी.एन.एस. २०२३ नुसार कलम ६४(२)(m), ६४(१) आणि ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, दहा दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने पीडित महिलेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फिर्यादीत नमूद माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख सप्टेंबर २०२४ मध्ये आरोपी अमोल धर्माधिकारी याच्याशी झाली. ही ओळख पुढे मैत्रीत रूपांतरित झाली. आरोपीने खोटे बोलत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले तसेच तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. याच बहाण्याने आरोपीने तिला श्रीगोंदा व परिसरातील शेतातील पत्र्याच्या खोलीत तसेच विविध ठिकठिकाणी लॉजवर नेऊन वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
लग्नाबाबत पीडितेने वारंवार विचारणा केली असता आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्याने स्वतःचे आधीच लग्न झाले असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पीडितेची घोर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडितेने फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने फोन न उचलल्याने अखेर २० सप्टेंबर २०२५ रोजी पीडितेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली.
फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी अमोल कमलाकर धर्माधिकारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र दहा दिवस उलटूनही आरोपी अद्याप अटकेत आलेला नाही. आरोपी धनदांडगा व पैसेवाला असल्याने पिडीतेच्या जीवितास धोका जाणवत असल्यामुळे पिडीत महिला वार वार पोलिस स्टेशनला जात असून आरोपी अद्याप फरार असल्यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्याला कोण अभय देत आहे का? असा संशय पीडितेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पीडितेची मागणी
आरोपीने मला लग्नाचे खोटे आमिष दाखवले, माझ्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले आणि वेळोवेळी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण नंतर तो माझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगत फसवणूक केली. माझ्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असूनही आरोपीला अटक झालेली नाही. त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
माझ्यावर अन्याय करून आरोपी अद्याप फरार आहे .सखोल पोलीस तपास होणे गरजेचे आहे पण अजून काही दिसून येत नाही त्यामुळे आरोपीला अभय मिळत आहे याचे गांभीर्य बाळगून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अन्यथा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेणार असल्याचे पिडीत महिलेने सांगिलले .