संघर्षनामा वृत्तसेवा l नगर
दि.२९जाने.२०२५
प्रतिनिधी,
प्रसिद्धी माध्यमातील चौरस आणि चौकस व्यक्तिमत्व, शैक्षणिक ,सामाजिक कार्यात अग्रेसर कर्तृत्व पत्रकार अशोक सूर्यवंशी सर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष करणारं नेतृत्व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गाडगे यांनी जिल्हा संघटन आणि जिल्हा,तालुका कार्यकारणी निवड प्रक्रिया गतिमान केली असून यासाठी समक्ष कार्यकुशलता मध्यनजर ठेवून अशोक सूर्यवंशी सर यांची जिल्हा सचिव पदावर निवड करून तात्काळ नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व राज्यसचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांची कार्यप्रणाली जनमानसातील प्रत्येक पत्रकार बांधवांपर्यंत जावी त्यांची दशा आणि दिशा पत्रकार संघाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडावी विमा संरक्षण, पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना, आधिस्वीकृती ,जिल्हाभर पत्रकार भवन उभारणे, पत्रकार महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक व्यावसायिक, शैक्षणिक प्रगती आधुनिक प्रणाली द्वारे पत्रकार बांधवांना माहिती आणि मार्गदर्शन तथा कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शन शिबिरे आदि प्रमुख बाबी जिल्ह्यावर राबवणे लक्ष असून त्या कामे नवनियुक्त जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी सर यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांना सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गाडगे यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.
पत्रकार अशोक सूर्यवंशी सर हे मुख्याध्यापक, निवेदक आणि विविध सामाजिक शैक्षणिक संघटनात्मक महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याने त्यांना अहिल्यानगर जिल्हाच्या सचिव पदाची जबाबदारी दिल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा संघटनआणि कार्यपद्धती राज्यात प्रभावी ठरणार अशी चर्चा पत्रकार बांधवांमध्ये होत आहे.
दिलेल्या जबाबदारीनुसार पत्रकार ,शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा संघटन कौशल्यासाठी कस लावणार असून या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची ध्येय धोरणे तळागाळातील पत्रकार बांधवापर्यंत पोहोचवून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्यसचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गाडगे यांच्या खांद्याला खांदा लावून दिशादर्शक काम करणार असे नवनियुक्त जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी सर यांनी सांगितले .
या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक आमदार राम शिंदे ,पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील ,माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,आमदार रोहित पवार ,आमदार विक्रमसिंह पाचपुते ,आमदार शिवाजीराव कर्डिले ,आमदार संग्रामभैया जगताप, आमदार काशिनाथ दाते ,आमदार मोनिकाताई राजळे, आमदार हेमंत ओगले, आमदार अमोल खताळ ,आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, रुलर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ए.बी.चेडे ,वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभव महांगरे (नागपूर ) आदर्श मुख्याध्यापक भाऊसाहेब सुद्रिक, इंजिनिअर राम नाथ, जिल्हाध्यक्ष तथा झी24तास चे जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय गाडगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा तालुक्याचे अध्यक्ष माधव बनसुडे, उपाध्यक्ष तथा संघर्षनामाचे मुख्यसंपादक मेजर भिमराव उल्हारे,उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर, सचिव अमोल झेंडे, खजिनदार किशोर मचे सर्व पदाधिकारी, पत्रकार,निवेदक उज्वला उल्हारे आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.