सिद्धार्थनगर जि.प.शाळेत विविध शालेय समित्यांच्या निवडी जाहीर.

संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा

दि.२८ ऑगस्ट २०२४

 (प्रतिनिधी) सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळेतील विविध शालेय समित्यांच्या निवडी शाळेच्या सभागृहात सुमारे शंभर महिला व पुरुष पालकवर्गाच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

       या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी घोडके होते. यावेळी जीवाजी घोडके, हृदय घोडके, अनिल ससाणे, आनंद घोडके, गोरख घोडके, सुनील घोडके, भारत घोडके यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सी.सी.टीव्ही तातडीने बसविन्याची आवश्यकता व्यक्त करत शाळे जवळून राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 डी. जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली. सुमारे दोनशे पर्यंत पटसंख्या होत असलेल्या या सातवीपर्यंतच्या शाळेतील गुणवत्तेत व पटसंख्येत होत असलेल्या वाढीबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्गाचे अभिनंदन करत कौतुक करण्यात आले.

           यावेळी झालेल्या निवडी पुढीलप्रमाणे 

1) शाळा सल्लागार समिती:-

 अध्यक्ष- डॉ.संतोष नारायण घोडके 

 उपाध्यक्ष - नंदू श्रावण ससाने 

2) शालेय बांधकाम समिती:-

 अध्यक्ष-संदीप दिलीप उमाप 

 उपाध्यक्ष- आनंद धोंडीबा घोडके 

3) माता पालक समिती:-

 अध्यक्ष- रेखा लक्ष्मीकांत घोडके 

 उपाध्यक्ष- अरुणा अर्जुन ससाने 

4) शिक्षक पालक समिती:-

 अध्यक्ष- गोरख जालिंदर घोडके 

 उपाध्यक्ष-किशोर मारुती नेटके 

5) शालेय पोषण आहार समिती:-

 अध्यक्ष- नीलम आनंद घोडके 

 उपाध्यक्ष- रूपाली नितीन वायदंडे 

6) शाळा परिवहन समिती:-

 अध्यक्ष- संदीप युवराज मोटे ( मुख्याध्यापक )

उपाध्यक्ष -सुरज भानुदास घोडके 

 व नितीन पांडुरंग ससाने 

7) महिला तक्रार निवारण (विशाखा) समिती :-

 अध्यक्ष- शेळके शारदा प्रकाश(शिक्षिका)

 उपाध्यक्ष-पूजा संदीप ससाने

8) शाळा व्यवस्थापन समिती:-

 अध्यक्ष- भाऊसाहेब अंकुश घोडके 

 उपाध्यक्ष- पप्पू दिलीप घोडके

     यावेळी समित्यामध्ये निवड झालेल्या सदस्यांसह माननीय चंपालाल घोडके, जितेंद्र पाटोळे, गणेश घोडके, भिका ससाणे, अक्षय ससाणे, श्याम घोडके, ऋषी कांबळे, वर्षा शेलार, राणी घोडके, दत्तात्रय घोडके, आशा गायकवाड, गंगावती भिंगारदिवे, अरुणा ससाणे, रेखा घोडके, सुमनताई ससाणे, शिक्षक संतोष सोनवणे, वर्षा घालमे, ज्योती खंडागळे, मंगल मोटे आदींसह मोठा पालकवर्ग उपस्थित होता.

   या सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी केले तर सूत्रसंचालन शारदा शेळके यांनी केले. आभार संतोष खंडागळे यांनी मानले.

Related Post