कर्जत जामखेडच्या हिताच्या प्रश्नी आ.रोहीत पवार यांनी प्रामाणिक रहावे-शेखर खरमरे

संघर्षनामा न्यूज l कर्जत 

दि.१९ जुलै २०२४

प्रतींनीधी, उज्वला उल्हारे 

जनतेच्या प्रश्नाप्रती सदैव जागल्याची भूमिका पार पाडणारे अशी ओळख असणारे आ . प्रा राम शिंदे साहेब एका बाजूला ....

तर श्रेयवादाची लढाई करत पुन्हा त्याला प्रादेशिक वादाची फोडणी देणारे कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी दुसऱ्या बाजूला ....

आ .रोहीत पवार साहेब कमीत कमी जनतेप्रती असलेली बांधिलकी तरी प्रामाणिकपणे निभावणार आहात का नाही? असा परखड सवाल भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी उपस्थित केला आहे...... 

प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना त्यांनी डिंबे धरण ते माणिकडोह धरण बोगद्या बाबतची संपूर्ण वस्तुस्थिती मांडली . . .

कर्जत जामखेड मध्ये नेहमीच श्रेयवादाची लढाई होते त्यामध्ये वस्तुस्थितीचा विपर्यास करून कुरघोडी चे राजकारण कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी पवार साहेब नेहमीच करतात . . .

 डिंबे धरण ते माणिकडोह धरण जोड बोगद्या बाबत प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे कि   कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, करमाळा या दुष्काळी तालुक्यांना उपयोग व्हावा व कुकडी डाव्या कालव्याच्या अवर्तनावर डिंबे धरणाच्या डाव्या तीर कालव्यातील पाणी गळतीमुळे आणि विसर्ग क्षमता कमी झाल्यामुळे जो विस्कळीतपणा येतो आणि त्यामुळे दुष्काळी तालुक्यांना मिळणाऱ्या कुकडी डावा कालवा आवर्तन अंतर्गत पुरेसे पाणी मिळत नाही यावर उपाय म्हणून  डिंभे धरण  डाव्या तीर कालव्यास पर्याय म्हणून डिंबे ते माणिकडोह धरणाला जोडणाऱ्या जोड बोगद्यास आ प्रा राम शिंदे यांनी अहमदनगरचे पालकमंत्री असताना सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मान्यता मिळवली होती .१६.१० कि.मी च्या कामास २१७.८६ कोटी रुपये इतकी तरतूद या कामासाठी करणेत आली होती .......

  परंतु मविआ २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्या नंतर राजकीय दबावाने आणि प्रादेशिक वादाने तत्कालिन मविआ सरकार मधील जलसंपदा मंत्री यांनी या बोगद्याची उलटी गणती सुरु केली आणि काम ठप्प पडले . मविआ सरकार महाराष्ट्रात असताना हा प्रश्न त्यांच्या कडून सुटणार नाही अशी खात्री झाल्याने अहमदनगर चे माजी खासदार डॉ . सुजयदादा विखे पाटील यांनी यासंदर्भातील प्रश्न सन २०२१ मध्ये संसंदेत उपस्थित करून केंद्राने या प्रश्नी भाग घेऊन प्रश्न सोडवावा यासाठी संसंदेच्या सभागृहात भूमिका माडली होती.

 आ प्रा राम शिंदे हे आपल्या भागातील प्रश्नासाठी नेहमीच जागरूक असतात आणि पाण्याचा प्रश्न तर तालुक्यासाठी यक्ष प्रश्नासारखा आहे म्हणून त्यांनी याबाबत माहिती घेऊन सभागृहाच्या पटलावर तारांकित प्रश्नाद्वारे २०२४ च्या अधिवेशनात या बोगद्याच्या कामाच्या सद्यस्थिती बद्दल प्रश्न उपस्थित केले त्याला जलसंपदा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी उत्तर दिले कि २८ जून २०२२ च्या शासन निणर्यानुसार चतुर्थ सुप्रमा मध्ये यास तत्वतः मान्यता दिली आहे व तशा प्रकारचा अहवाल महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी२३/०६/२०२३ रोजी  शासनास सादर केला आहे परंतु शासन निर्देशानुसार कुकडी प्रकल्पांचे फेर जलनियोजन प्रस्तावित असून फेर जलनियोजन अंतिम झाल्यानंतर बोगद्याचे काम होणार आहे . . . .

                     अशी वस्तुस्थिती असताना कर्जत जामखेडचे आ . श्री रोहीत पवार बोगद्याच्या कामाचे श्रेय कशाच्या आधारे घेतात? फक्त त्यांनीच दिलेल्या पत्राचे आधारे कि फोटो काढून? विकास कामात अडथळा आणला म्हणतात मग त्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित का केला नाही? मविआच्या काळात तुम्ही सत्तेत असताना या प्रश्नावर मूग गिळून गप्प का होतात? यासंदर्भात भूमिका का मांडली नाही? या मागचे इंगित कर्जत जामखेड सह सर्व नगस्च्या दुष्काळी तालुक्यांना माहित झाले आहे . तुम्हाला पुणे जिल्ह्यातील बंधारे भरण्याची काळजी असावी कदाचित जन्मभूमिच्या काळजीपोटी कर्जत जामखेड च्या कर्मभूमीतील जनतेला वाऱ्यावर सोडले वाटते . तुमचे पुतणा मावशी प्रेम कर्जत जामखेड मधील शेतकरी जाणून आहे .शेवटी या मातीतील भूमिपुत्रालाच त्याच्या स्वयकियांची काळजी म्हणून आ प्रा राम शिंदे यांनी या कामाची वस्तुस्थिती जाणण्यासाठी सभागृहात प्रश्न मांडले . . आमदार महोदय तुम्ही तर बोगद्याच्या मंजुरीचे श्रेय घेताना सुद्धा पुणे जिल्हयातील शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान होणार नाही म्हणत बोटचेपी भूमिका मांडत होतात अर्थात पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍याचे यामध्ये काय नुकसान होते? काहीच नाही उपाय पाणी वाया जाते यावर आहे आणि ते वायाला गेलेले पाणी मिळाले तर दुष्काळी कर्जत जामखेड, पारनेर, करमाळा, श्रीगोंदा या कुकडी प्रकल्पातील दुष्काळी तालुक्यांचा कुकडी डाव्या कालवा आवर्तनाचा खेळखंडोबा होणार नाही . . यामध्ये पुण्याच्या शेतकरी बांधवांचे नुकसान काय होणार होते? पण तुम्हाला तुमच्या जन्मभूमीतील शेतकर्‍याना मी तुमचा कैवारी आहे असे दाखवत कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांना ही फसवायचे आहे . इतके दुटप्पी वागणे एका लोक प्रतिनिधीला शोभते का? एव्हढे करून तुम्हीच आरोप करणार? विकास विरोधी पणाचा? ....

 जनतेच्या दरबारात या खोटेपणाची उत्तरे द्यावी लागतील . कर्जत जामखेडची जनता सहनशील आहे पण म्हणून स्वाभिमानी नाही असा तुमचा गैरसमज झालेला आहे काय? स्वाभिमानी कर्जत जामखेडकर यांच्या अस्तित्वावरच हा हल्ला आहे याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल .

Related Post