खांडगाव येथे तरसाच्या हल्लात वृध्द जखमी,

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

 दि.१८ जुलै २०२४

प्रतिनिधि,


श्रीगोंदा तालुक्या मधील खांडगावचे रहिवासी चंपालाल यल्लाप्पा कुऱ्हाडे यांच्या वस्तीवर सकाळी ८ वाजता दोन तरसाने जीवघेणा हल्ला केला असून ते त्यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

 सदर माहिती,जि.प माजी सदस्य सचिन भाऊ जगताप यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने बनपिंप्रीचे सरपंच गौतम पठारे यांना सूचित करुन घटनास्थळी पाठवत  तातडीने घटनेचाआढवा घेण्यास सांगितले.


सरपंच गौतम पठारे व खांडगावचे सरपंच काकासाहेब ढवळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता तरसाच्या हल्ल्यात कुऱ्हाडे  हे गंभीर जखमी झालेले दिसले त्यांनी तातडीने सचिनभाऊ जगताप यांना माहिती दिली असता, जगताप यांनी त्यांना रुग्णालयात नेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय येथे आणून त्यांच्यावर उपचार सुरू केलेआहेत .

त्यावर तातडीने सचिनभाऊ जगताप यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या कुऱ्हाडे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली .


माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले की भर दिवसा नागरी वसाहतीमध्ये हिंसक प्राणी येऊन नागरिकांवर जीवघेणा हल्ला करत आहेत, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चंपालाल कुऱ्हाडे यांचा जीव वाचला आहे पण नागरिकांनी  तरसांना हुसकून लावताना  चंपालाल कुऱ्हाडे यांना सोडून दिले तरी देखील सुमारे तीनशे चारशे नागरिक असून देखील दोन तरस घाबरायला तयार नव्हते हा लोकवस्तीला धोका असुन  वन विभागाने हिंसक प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिनभाऊ जगताप यांनी वन विभागाकडे करत मांडवगण गटातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले.

Related Post