मुख्याध्यापक तनपुरे यांची व्यंकनाथ विद्यालयाला सदिच्छा भेट!

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.८जून २०२४

     

     लिंपणगाव (प्रतिनिधी)- चिलवडी तालुका कर्जत येथील नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांतीलाल तनपुरे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय दळवी यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापक कांतीलाल तनपुरे यांनी विद्यालयाचा प्रशस्त परिसर; विविध वृक्ष लागवडीतून नटलेला सौंदर्यपूर्ण परिसर; विद्यालयाच्या प्रत्येक वर्ग खोली समोर भिंतीवर रंगकामाद्वारे विविध राष्ट्रीय नेत्यांचे बोलके तैल चित्र; सुसज्ज संगणक कक्ष; विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण बैठक व्यवस्था; विद्यालयाचे सौंदर्यपूर्ण वृक्ष लागवड; विद्यालयामार्फत विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत शिक्षक वर्गाकडून जादा तासांचे नियोजन; त्या परीक्षांमध्ये नेत्र दीपक गुण मिळवून चमकलेले विद्यार्थी; प्रत्येक वर्षी एसएससी व  एच एस सी परीक्षांचे उत्कृष्ट निकाल याबाबत मुख्याध्यापक श्री तनपुरे यांनी उपस्थित दरम्यान समाधान व्यक्त केले आहे. निश्चितच श्री व्यंकनाथ विद्यालय तालुक्यात एक आदर्श विद्यालय म्हणून कार्यरत असल्याचे गौरवगार श्री तनपुरे यांनी यावेळी काढले.


   सत्कारानंतर बोलताना मुख्याध्यापक श्री तनपुरे पुढे  म्हणाले की; विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सस्ते यांनी  दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यालयाचे प्रशासन सांभाळताना शालेय शिस्त व्यसनमुक्ती विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच धार्मिक क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. ते आणखी पुढे म्हणाले की; विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधताना विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे जादा तास; विद्यालयाचा स्थापनेपासून लागलेला इयत्ता दहावीचा उच्चाअंकी निकाल; शिक्षण संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. असे सांगून विद्यालयाची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशी प्रार्थना व्यंकनाथ महाराजांना करत मुख्याध्यापक तनपुरे यांनी विद्यालयाने जो सन्मान केला त्याबद्दल मुख्याध्यापक तनपुरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक संजय दळवी; जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर; सेवानिवृत्त लिपिक पोपटराव राऊत; विद्यालयाचे कर्मचारी एकनाथ नेटवटे आदी यावेळी उपस्थित होते.

Related Post