बँक ऑफ बडोदा कर्मचाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२८ मार्च २०२५

प्रतिनिधी,

ऋषिकेश अशोक जाधव यांनी बॅक आफ बडोदा (शाखा वाई) येथील कर्मचारी धीरज जाधव व शिवाजी घोटगे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अनुच्छेद ३५२,३५१(२),३५१(३), ३(५) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

  ऋषिकेश जाधव व अमोल जाधव बँकेतील कामकाजात संदर्भात गेले असता.शिवाजी घोटगे व  धीरज जाधव यांनी तुच्छतेचे वर्तणूक दिली,तसेच तुमची योग्यता नाही, बँकेत पाऊल ठेवू नका,अशा लोकांना बँकेत घेऊ नये,आमची बँक आहे असं म्हणत बँकेतून सुरक्षा रक्षका मार्फत बाहेर काढले.तसेच तुमच्या सारखे खूप बघितले आहेत असं म्हणत दमबाजी केली. यामुळे सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वर्तणूक, दमबाजी, शिवीगाळ, या कारणाखाली दिनांक २७ मार्च २०२५ रोजी वाई पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला.तसेच यातून योग्य कारवाई न झाल्यास सर्व समाजबांधव एकत्रीत येऊन बडोदा बँकेबाहेर आंदोलन करण्याबाबत भूमिका घेऊ अशी भावना ऋषिकेश जाधव व अमोल जाधव यांनी व्यक्त केली.

Related Post