अहिल्यानगर येथे बहुजन रयत परिषदे च्या बैठकीचे आयोजन.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.६एप्रिल २०२५

प्रतिनिधी,

बहुजन रयत परिषदेचे सर्व  सदस्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सुचीत  करण्यात येते की, बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे यांचे नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्षा ॲड.कोमलताई साळुंखे- ढोबळे यांच्या मार्गदर्शनाने व इतर पदाधिकारी समवेत

 अहिल्यानगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी सकल मातंग समाज महामोर्चा च्या दिनांक 20 मे 2025 रोजी च्या आयोजना संदर्भात बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अँड .कोमलताई ढोबळे -साळुंखे व इतर पदाधिकारी बहुमोल असे मार्गदर्शन करणार आहेत. 

सदर बैठक दिनांक: 10 एप्रिल 2025

वेळ: दुपारी 01:00 वाजता

स्थळ: रहमत सुलतान हॉल, महापालिका शाळा क्रमांक 13 च्या समोर, सर्जेपुरा चौक, अहिल्यानगर येथे होणार असुन उत्तर महाराष्ट्रातील बहुजन रयत परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष प्रा.नाम साठे सर यांनी केले आहे.

Related Post