सभापती प्रा.राम शिंदे यांना आ.रोहित पवार यांनी राजशिष्टाचार शिकवू नये-संतोष रायकर

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२०मार्च २०२५

प्रतिनिधी,

 कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार हे नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात ज्यांनाच राजशिष्टाचार काय असतो हे अजून समजलेले नाही. त्यांनी राम शिंदे यांच्या राज शिष्टाचार संदर्भात बोलावे हा विनोदच आहे..

    आ.रोहित पवार हे विधानसभेच्या निवडणुकीपासून जनतेमध्ये नसून लोक त्यांना आता विचारत नाहीत यामुळे ते बेताल वक्तव्यं करत असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संतोष रायकर यांनी म्हटले आहे.

   मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय थोडक्यात फरकाने रोहित पवार यांचा विजय झाला हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे.प्रा. राम शिंदे यांचा विधानसभेला पराभव होऊनही महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या संविधानिक पदावर जाऊन बसल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनता प्रा.राम शिंदे यांचे कडे अशाने पाहतेय हे रोहित पवारांना पाहवत नसल्याने त्यांनी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य सुरू केले आहे.

 मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी कोणत्या भाषेचा प्रयोग संपूर्ण निवडणुकीमध्ये केला हे जनता विसरलेली नाही.

 याउलट  प्रा.राम शिंदे  हे चारित्र्यसंपन्न  गुणी व्यक्तिमत्त्व आहे सर्वसामान्य माणसाची जाण असणारे व सर्वसामान्य घरातील माणूस विधानपरिषद सभापती पदापर्यंत पोहोचला हेच या पवारांना मान्य नाही प्रा.आ. शिंदे हे  सर्वसामान्य माणसाला जवळ करणारे सर्वांना आपले वाटणारे नेतृत्व असल्या कारणाने मतदार संघातील अनेक प्रश्नांना दिशा देण्याचे काम व ते सोडवण्याचं काम त्यांच्या  माध्यमातून होत आहे.

 यापूर्वी प्रा. राम शिंदे यांनी  आमदार, राज्याचे मंत्री आणि आता विधानसभेचे सभापती म्हणून जी  कामाला गती दिलेली आहे ते सर्वसामान्य माणूस विसरू शकत नाही. आता प्रा. राम शिंदे यांच्या शिवाय पर्याय नाही आपल्या मतदारसंघातील प्रश्न हे फक्त प्रा.आ.राम शिंदे हेच सोडू शकतात. हे जनतेच्या लक्षात आल्याने यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाढला आहे. हेच रोहित पवार यांना खूपत असल्याने प्रा.आ. शिंदे यांच्या वर काही बोलावे म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करून आपण कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जनतेने आपल्याला नाकारले आहे हे आता त्यांच्या लक्षात येत आहे. 

 विधान परिषदेचे सभापती हे सभागृहामध्ये सर्व पक्ष असतात आणि सभागृहाच्या बाहेर त्यांना त्यांच्या मनानुसार काम करता येते हे आ.रोहित पवारांना माहीत नसून त्यांनी अगोदर राज शिष्टाचार समजून घ्यावा आणि नंतर बोलावे 

 आ.रोहित पवार यांनी विधान परिषद सभापती पदाचा अवमान केला आहे.

        अशा प्रकारचे बेताल वक्तव्य आ  रोहित पवार यांनी करू नये असे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संतोष रायकर यांनी म्हटले आहे.

Related Post