देवीभक्त नंदकुमार कोरपे आणि सतीश वाघमारे यांच्याकडून श्री कमलादेवी मंदिरास देणगी प्राप्त!

संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा

दि.8 मार्च 2025

प्रतिनिधी,

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपाततील असलेले मुळ मंदिरराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. 

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व  संवर्धन कामस गेल्या  वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन  संवर्धनाचे काम  प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

 शुक्रवार दिनांक,०७.०३.२०२५.रोजी  चि. प्रथमेश सतीशराव वाघमारे. याच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता श्री. सतीश लक्ष्मणराव वाघमारे. रा. करमाळा यांच्याकडून ऑनलाईन देणगी ५,१००/_ (पाच हजार शंभर  फक्त) यांचे कडून देणगी प्राप्त झाली आहे . यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीचे विश्वस्त श्री. सुशील राठोड. श्री .प्रकाश  सोरटे ,यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने मंदिर प्रदक्षिणा मार्गावर व्हाईट (पांढरा)कलर भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून प्रदक्षिणा मार्गावर पांढरा कलर श्री. नंदकुमार कोरपे रा. करमाळा माजी करमाळा नगरपालिका अधिकारी यांच्याकडून अंदाजे खर्च २५,२००/_(पंचवीस हजार दोनशे फक्त)  कलर खर्च देण्यात आलेला आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिराचे मंदिर समितीचे विश्वस्त श्री सुशील राठोड, पुजारी रोहित पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे, यांच्याकडून सत्कार करण्यात आला .या वेळी मंदिर सेवेकरी मानकरी, व भक्तगण तसेच  वाघमारे परिवार, कोरपे परिवार, उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे .

तसेच ऑनलाईन देणगी ची  सुविधा उपलब्ध आहे .

संपर्क अशोक गाठे- व्यवस्थापक .

मो नं ९४०४७०८९२४.

Related Post