खरंच स्त्रीच्या आयुष्यात पुरुषाची गरज आहे का ?

संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा

दि.8 मार्च 2025

प्रतिनिधी,

पाहिल्यात स्त्रिया..

नवरा असून, 

एकट्याच संसार करणाऱ्या..

कपाळावर कुंकू आहे...

म्हणून .. होतंय..समाजातल्या 

वाईट नजरांपासून रक्षण...

यात समाधान मानणाऱ्या..

माहेरात नाही सांगता येत..

सगळंच..स्वतःवर बेतलेलं...

रात्रीच्या जखमी आयुष्यानंतर..

दिवसा..खूप बडबड करत..

मनातलं काहीच न बोलणाऱ्या..

ऑफिसात...

 मोठया खुर्चीवर असल्यातरी..

सगळे अधिकार..उंबऱ्याच्या बाहेर

ठेवून... 

स्वतःच्याच घरात..

स्वतःच अस्तित्व शोधणाऱ्या...

नवऱ्याच्या मृत्यूनंतर..

घरातला पुरूष झाल्यातरी..

स्वतःला..सगळ्याच समारंभात..

आपणहून मागे राहून..

समारंभाचे सगळे सोपस्कार..

दूर कोपऱ्यात उभं राहून पाहणाऱ्या..

अन दुसरीकडे...

असतात अशाही स्त्रिया...

अंधाराच भय न मानता..

रात्री प्रवास करणाऱ्या...

कितीही असली स्वतःची बॅग जड

तरीही ..स्वतःच ओझं 

स्वतःच उचलणाऱ्या..

स्वतःचे आर्थिक व्यवहार..

स्वतःच करणाऱ्या..

घरातला ब्लब.. ते..

सिंकचा पाईप स्वतः बदलणाऱ्या..

स्वतःच्या जीवावर उच्च शिक्षण घेत..

कसलाही गर्व न बाळगणाऱ्या...

खटकतं तिथे..प्रश्न विचारणाऱ्या..

निर्भयपणे..स्वतः च मत मांडणाऱ्या...

समाजाच्या चुकीच्या..पद्धतींना.. नाकारून

स्वतःचा आत्मसन्मान..जपत..

होणाऱ्या टीकेला..शांत राहून...

कृतीतून उत्तर देणाऱ्या..

आयुष्य जगताना..

स्वतःच स्वतःला पडणाऱ्या 

असंख्य प्रश्नांचे.. उत्तर..

स्वतःच शोधणाऱ्या...

भेटतात जेव्हा...

या दोन्ही स्त्रिया.. 

समोरासमोर..

बोलतात नजरेने..

एकमेकींशी..

खरंखुरं जगणं...

सापडलं..की..

एकमेकींना नक्की सांगू.

स्नेहा कोळगे

मो. 9167691419

Related Post