संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२७फेब्रुवारी २०२५
प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे शिवशक्ती मित्र मंडळाने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. हि स्पर्धा रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी सात वाजता सुरु होणार आहे.अनेक प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हि स्पर्धा पार पडणार आहे. दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातुन येथे स्पर्धक येतात.व आपले कला कौशल्य दाखवतात. शिवशक्ती मित्र मंडळ दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असते . धार्मिक व सामाजिक कार्यात हे मंडळ नेहमी अग्रेसर आहे.याही वर्षी शिवशक्ती मित्र मंडळाने छान प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच या स्पर्धेसाठी उत्तम बक्षीस दिली जाणार आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती ही स्पर्धा पार पडणार आहे. तसेच सोलो डान्स व ग्रुप डान्स साठी अगदी समान बक्षीसही ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 7000 रुपये,तर द्वितीय क्रमांकासाठी 5000 रुपये,तर तृतीय क्रमांकासाठी 3000रुपये तर चतुर्थ क्रमांक 2000 रुपये हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच जे स्पर्धक क्रमांक मिळवणार त्याला रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देण्यात येऊन गौरव करण्यात येणार आहे. यावेळी शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष व युवा नेतृत्व विकासभाऊ साळवे म्हणाले कि,हि स्पर्धा पारनेर तालुक्यात सर्वात मोठी असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे अहवान केले तसेच मंडळाचे उपाध्यक्ष अजित राऊत,सचिव किरण बढे,खजिनदार प्रवीण ढवळे,अमोल लोंढे, सहसचिव,सह खजिनदार,सल्लागार व सर्व शिवशक्ती मित्र मंडळाचे सदस्य यांच्या वतीने या सुवर्णसंधीच्या सर्व स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे मंडळामार्फत आव्हान केले आहे.