संघर्षनामा वृत्तसेवा l कर्जत
दि .२२नोव्हेंबर २०२४
प्रतिनिधी ,उज्वला उल्हारे
मिरजगाव:-सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन मिरजगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्ताने संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. शंकरशेठ नेवसे यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उद्योगभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
थोर साहित्यक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना समर्पित कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळ आयोजित सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मिरजगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कवी संमेलन अध्यक्ष नितीन चंदनशिवे, कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक तात्या निकाळजे ,स्वागत अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह अध्यक्ष सुरेश काका गोरखे तसेच कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष तानाजी डाडर कार्याध्यक्ष सुनील गाडे ,उपाध्यक्ष डी डी राऊत, उद्धवशेठ नेवसे आदी उपस्थित होते.
यावेळी सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगावच्या विद्यार्थ्यांची भव्य ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम ढोल पथक व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला.
ग्रंथ दिंडी,महापुरुषाचे प्रबोधनपर गीते, एकपात्री प्रयोग मी महात्मा फुले बोलतोय, स्नेहभोजन, व्याख्यान, कथा कथन, कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. शंकरसेठ नेवसे अध्यक्षा कल्याणी ताई नेवसे, संस्थेचे सचिव राजेंद्र गोरे, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, संस्थेचे समन्वय प्रा. सुरज जाधव, प्रा.अमोल विधाते, प्रा. चांगदेव माने, प्रा. बाळासाहेब पारखे, डॉ श्रुती कदम, प्रा. शिंदे मॅडम तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीआदि मान्यवर उपस्थित होते.