संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२५सप्टेंबर २०२४
प्रतिनिधी,
जसे तुम्ही कर्म कराल त्याचप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल.
विचार करा! संग काय घेऊन जाणार आहात ?
बघता- बघता एक दिवस मरण येईल.
सर्व काही इथेच राहून जाईल.
ज्यांना तुम्ही जन्म दिला आहे.
तेच तुम्हाला अग्नी डाग देऊन जातील.
दुसरे कोणी हात देखील लावणार नाही.
हे कालचक्र आहे, हे चालत आलेले आहे आणि पुढेही चालत राहणार आहे.
उद्या तुमच्या संपत्तीचा दुसरा कोणीतरी मालक होईल.
म्हणून असे काही तरी करून जा! की तुमचे पाठीमागे नाव राहील.
नाहीतर तुमचे नाव देखील राहणार नाही.
तुम्ही केलेला धर्म आणि कर्मच तुमच्याबरोबर येईल.
बाकी सर्व येथेच सोडून जावे लागणार आहे.
एकटे आले आहात आणि एकटेच जावे लागणार आहे.
कोणाला बरोबर आणले नव्हते.
कोणालाही बरोबर घेऊन जाणार नाही.
हे जीवन चक्र आहे, यापासून कोणीही वाचलेला नाही.
ज्याचा जन्म झाला आहे.
त्याचा एक दिवस अंत होणार आहे, हे निश्चित आहे.
जीवनात देवाला कधीही घाबरू नका...!!
देव तर तुम्ही केलेल्या चुकांना देखील माफ करेल.
परंतु जर तुम्हाला घाबरायचेच आहे ना...!!
तर तुम्ही केलेल्या वाईट कर्माला घाबरा...!!
वाईट केलेले कर्म कधीच माफ करत नाही.
ते तुम्हाला साफ करते.
तुम्हाला स्वर्ग मिळेल की नर्क याचा निर्णय तुम्ही स्वतःच करतात.
तुमची वाणी, तुमचे विचार, तुमचा दुसऱ्यांना पाहण्याचा दृष्टिकोन व तुमचे बोल हेच तुमचे भाग्य ठरवितात.
तुम्ही जर चांगले कर्म केलेले असेल तर, तुमचे नशीब तुमची दासी आहे.
आणि तुमचे मन खरे असेल तर तुमच्या घरामध्येच मथुरा आणि काशी आहे.
मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर