संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२२सप्टेंबर २०२४
प्रतिनिधी पिंपळा
महाराष्ट्र राज्यातील - सन २०२४- २५ मध्ये राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, मेंढ्याकरिता चराई अनुदान योजना, मेंढीपालनाकरिता जागा खरेदी करिता अनुदान देणे व १०० कुक्कुट पक्षींची खरेदी व संगोपानाकरिता अर्थसहाय्य करणे या योजना राबविणेकरिता संदर्भीय शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून सोबत सलंग्र करण्यात आलेले आहेत. वरील योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करून लाभधारक निवड प्रक्रिया राबविणे, लाभार्थी निवड समिती मार्फत लाभार्थीची प्राथमिक निवड करणे, निवड झालेल्या लाभार्थ्यांकडून कागदपत्रे अपलोड करून घेणे, विविध स्तरावरून कागदपत्रांची छाननी करणे व लाभार्थी निवड समिती मार्फत अंतिम निवड यादी तयार करणे इ प्रक्रिया महामंडळ करणार आहे. महामेष योजनासाठी अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक १२ सप्टेंबर २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्व समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री.अमोल खटके यांनी केले आहे
सर्व समाज बांधवांसाठी ऑनलाईन अर्ज निःशुल्क भरुन देणार असं ही ते यावेळी म्हणाले.तरी अधिक माहितीसाठी 7887808669 या नंबर वर संपर्क साधावा