महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.

संघर्नामा वृत्तसेवा l कर्जत 

दि.३०ऑगस्ट २०२४

प्रतिनीधी, उज्वला उल्हारे 

मिरजगाव: येथील रुरल एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिरजगाव पोलीस स्टेशनचे पी.आय. मा. श्री. प्रकाश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी करताना भाऊ बहिणीने संघर्ष न करता प्रेमाचे नाते जोपासावे, समाजामध्ये वावरताना प्रत्येक स्त्री आपली बहीण आहे असे समजून वर्तन करणे आवश्यक असून, अडचणीत असलेल्या महिलांनी 112 नंबर डायल करून आपली तक्रार नोंदवावी भाऊ म्हणून पोलीस विभाग आपल्या पाठीशी उभा आहे असे प्रतिपादन केले. 

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. चंद्रकांत मंडलिक हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये रक्षाबंधन सणाविषयीच्या आख्यायिका व ऐतिहासिक संदर्भ सांगून भारतामध्ये रक्षाबंधन सणाला सांस्कृतिक महत्त्व असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. भूषण तागड यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. तानाजी जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Post