शिवछत्रपती ग्रुप कडून विद्यार्थी,सायकल वारकरी रायडर्स सन्मान सोहळा संपन्न.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२७ऑगस्ट २०२४

घोगरगाव प्रतिनीधी,

शिवशंभु सायकल रायडर्स असोसिएशन, श्रीगोंदा आयोजित पंढरपूर सायकलवारी २०२४चा पारितोषिक वितरण समारंभ दौंड शुगर प्रा.लि च्या सभागृहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जिल्हा परिषद सदस्य व दौंड शुगर चे संचालक श्री.वीरधवल जगदाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रोहन खवटे अग्निपंख फाऊंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे व शिवशंभु सायकल रायडर्स असोसिएशन च्या अध्यक्षा विजया लंके उपस्थित होत्या. नवनियुक्त पी एस आय सचिन टेकवडे,पी एस आय सागर होले ,करनिरिक्षक राहुल डोंगरे व  जलसंपदा विभाग अधिकारी दिपालीताई डोंगरे व मंत्रालय कक्ष अधिकारी डॉ.मिरा थोरात यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते सायकलवारी यशस्वीरीत्या पुर्ण करणा-या रायडर्स चा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मा.वीरधवल जगदाळे यांचा पांडुरंगाची मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला तर शिवशंभु सायकल रायडर्स चे उपाध्यक्ष व वारीप्रमुख गोपाळराव डांगे यांचा सन्मान करण्यात आला.

प्रसंगी सायकल रायडर्स लक्ष्मीकांत पाठक,नवनाथ खामकर, भाऊसाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.ॲड.कावेरी गुरसळ यांनी आभार मानले  यावेळी श्रीगोंदा ,राशीन व दौंड, या ठिकानवरून  भाऊसाहेब खेतमाळीस, प्रशांत एरंडे,देवीदास खेतमाळीस, मनीषा काकडे,  गौरी कोहळे, रेश्मा डांगे, प्रीतम शहा, अमोल झगडे, आनंद कदम, दुर्गेश मोढळे,संदीप  वागजकर, प्राचार्य बिडगर सर,लतिका वाबळे, रेखा डोंगरे, या सह अनेक  सायकलप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन विठ्ठल जगदाळे,भाऊसाहेब वाघ, ॲड.संदीप येडे,संजय येडे,शिवछत्रपती सायकल ग्रुप दौंड यांच्या वतीने करण्यात आले होते.

 कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी पवार यांनी केले तर प्रस्तावना ॲड.संदीप येडे यांनी केली.

 दौंड शिवछत्रपती सायकल ग्रुप च्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Post