ह.भ.प.कै. देविदास चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२३ऑगस्ट २०२४

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव मुंढेकरवाडी येथील सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व ह भ प कै. देविदास एकनाथ चव्हाण वय 67 यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. कै देविदास चव्हाण हे अत्यंत संयमी; शांत व मित्रभाषी स्वभावाचे होते. प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. लिंपणगाव; मुंढेकरवाडी पंचक्रोशीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह; ज्ञानेश्वर पारायण सोहळा प्रसंगी ते हिरहिरीने सहभाग  घेत असत. त्यांच्या पश्चात पत्नी; एक मुलगा; चार बंधू; सुना; नातवंडे असा मोठा परिवार होता. मुंढेकरवाडी येथील समशानभूमी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  अंत्यसंस्कार प्रसंगी सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; संचालक विठ्ठलराव जंगले यांच्यासह धार्मिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी कै देविदास चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लिंपणगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ते माजी सैनिक प्रकाश चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग चव्हाण यांचे ते बंधू होत.

Related Post