संघर्षनामा न्युज l कर्जत
दि.१७ऑगस्ट २०२४
प्रतिनिधि, उज्वला उल्हारे
मिरजगाव: रुरल एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण मिरजगावच्या सरपंच सौ. सुनीता खेतमाळस मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रुरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ए बी चेडे, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र चेडे, श्री सर्जेराव बावडकर सर, डॉ. संगीता चेडे, श्री मंगेश आबा घोडके, श्री तुकाराम जवणे, श्री वैभव पवार, श्री बाळासाहेब इरकर इत्यादी मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच सौ. सुनीता खेतमाळस व प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मतदानाची सामूहिक शपथ घेण्यात आली व हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. तानाजी जाधव यांनी मानले.