ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे कार्य प्रेरणादायी-प्रा.हौसराव दांगडे

संघर्षनामा न्यूज l घोगरगाव 

दि.२६जुलै २०२४

 घोगरगाव  प्रतिनिधी, 

श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील काम प्रेरणादायी असून आपल्या निर्भीड पत्रकारितेतून उत्तम प्रकारे दिशादर्शक यशस्वी वाटचाल केली असल्याचे गौरव उद्गार मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक हाऊस राव दांगडे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले. 


    ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी व जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांचा मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

    मुख्याध्यापक श्री दांगडे पुढे म्हणाले की; पत्रकार कुरुमकर हे. शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 25 वर्षांपासून भरीव असे योगदान देत आहेत. त्यांच्या पत्रकारितेतून दुर्लक्षित समाजाला न्याय मिळतो. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणतात सोडवतात. त्याचबरोबरच त्यांचा विकासाच्या प्रश्नासंदर्भात अग्रलेख एक प्रेरणादायी व दिशादर्शक असतो. प्रशासनालाही त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागते. एक संयमी व मितभाषी असणारे कुरुमकर सर त्यांनी या क्षेत्रात सर्वांशी संवाद साधताना अगदी  सलोख्याचे संबंध ठेवल असून; पत्रकार कुरुमकर यांनी त्यांच्या निवडीतून निश्चितच पत्रकारिता क्षेत्रात तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अहोरात्र लेखन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम करतात. त्यामुळे तालुक्यातील अनेक विकासाभिमुख कामाला गती आल्याचे मुख्याध्यापक श्री दांगडे यांनी सांगून पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे असे मुख्याध्यापक श्री दांगडे यांनी यावेळी कौतुक करताना सांगितले. 


    यावेळी आपल्या गौरवोद्गारपर भाषणात पर्यवेक्षक विलासभाऊ सुलाखे यावेळी म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांचे तालुक्यातील सर्व शिक्षण संस्था व प्रशासनाशी सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्या लेखणीचा विशेष करून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांना अधिक फायदा होतो. जिथे कौतुकाची बातमी असेल तेथे निश्चितच कौतुक करतात. जिथे अन्याय तिथे वाचा फोडतात. त्यामुळे एक निर्भीड व सत्यतावादी पत्रकारिता त्यांनी जोपासण्याचे काम केल्याचे सांगून श्री दांगडे आणखी पुढे म्हणाले की; तालुक्यातील पत्रकार बांधवांनी त्यांच्यावर जी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ती निश्चितच ते समर्थपणे आपला कार्यकाल पूर्ण करतील असा विश्वास श्री सुलाखे यांनी व्यक्त करून पत्रकार कुरुमकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


       या सन्मान सोहळ्यास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी; शिक्षक; शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


  सूत्रसंचालन उपशिक्षक श्री शंकर यदलोड यांनी केले. उपशिक्षक आभार श्री रामदास पवार यांनी मानले.

Related Post