जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यासाठी दिंडी मार्गावर सुविधा .

संघर्षनामा न्यूज lनगर

दि.१७जुलै २०२४

प्रतिनिधी,

आषाढी वारीच्या निमिताने जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशसानाने दिंडी मार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.


नगर जिल्ह्यातून विविध धार्मिक प्रतिष्ठान तसेच गावांमधून दोनशेहून अधिक दिंड्या आषाढी करीता पंढरपूरला जातात.गेली अनेक वर्षाची ही परंपरा सुरू आहे.मात्र मागील वर्षी सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर मंत्री विखे यांनी जिल्ह्यातून जाणार्या वारकऱ्यासाठी दिंडी मार्गावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला.यासाठी महसूल आरोग्य पाणी स्वच्छता आशा सर्व विभागाच्या यंत्रणेतून या सुविधा दिडीतील भक्ताना उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला होता.


यंदाच्या वर्षी सुध्दा या सुविधा उपलब्ध करून देत जिल्हा प्रशासनाने आपला सेवाभाव जोपासला आहे.नगर ते सोलापूर मार्गावर विशेषता दिंडीच्या मुक्काची ठिकाण असलेल्या स्थळी यासर्व सुविधा उभारण्यात आल्या होत्या.पिण्याच्या पाण्यापासून ते आरोग्य सुविधांचा यामध्ये समावेश होता.


या सुविधामुळे जिल्ह्यातील वारकऱ्याना कोणतीही अडचण आली नाही.प्रशसानाने सुध्दा या सर्व समन्वयासाठी अधिकाऱ्याच्या नेमणुका करून सुविधांवर देखरेख करण्यात येत होती.स्वता जिल्हाधिकारी यामध्ये योग्य समन्वय राखून होते.जिल्ह्यातून गेलेल्या सर्व दिंड्यामधील वारकऱ्याच्या मंत्री विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांनी भेटी घेतल्या.

Related Post