नागवडे इंग्लिश मीडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.२१जून २०२४

लिंपणगाव प्रतिनिधि,

तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम व शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


क्रीडाशिक्षक प्रा.कैलास ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करे योग रहे निरोग उक्तीप्रमाणे मानवी जीवनामध्ये योग-प्राणायामाचे असणारे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण का साजरा करत आहोत, याविषयी मार्गदर्शन करून योगाचे विविध आसने तसेच सूर्यनमस्कार विद्यार्थ्याकडून करून घेतले.


याप्रसंगी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या विश्वस्त अनुराधा ताई नागवडे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन व वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना वृक्षतोडीमुळे होत असलेल्या जागतिक तापमान वाढीचे होणारे परिणाम तसेच गांभीर्य लक्षात आणून देत वृक्ष लागवडीचे महत्व विषद केले. तसेच नागवडे कुटुंबीयांतर्फे तालुक्यातील ग्रामपंचायतीना ५००० रोपे देऊन वृक्ष लागवडीची व्यापक मोहीम हाती घेत असल्याचे अनुराधाताई नागवडे यांनी यावेळी सांगितले.


योग दिनाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस.पी.गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Post