कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेसाठी आ.प्रा.राम शिंदेंचा पाठपुरावा..

संघर्षनामा न्यूज l कर्जत

दि.८जून २०२४

प्रतिनिधी, उज्वला उल्हारे 

 कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेतून कर्जतच्या सीना धरण प्रकल्पामध्ये पाणी मिळावे म्हणून आमदार प्रा राम शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री देवेन्द्र जी फडणवीस साहेब यांना१९/०५/२०२३ रोजी एक पत्र दिले होते त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला या विषयातील अहवाल तयार करून सादर करण्याचे सांगितले होते त्याप्रमाणे  दि.०६/०६/२०२४ रोजी जलसंपदा विभागाने आ .राम शिंदे यांनी उल्लेखिलेल्या मुद्दयासह स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधिताना दिले आहेत . कर्जतच्या सीना धरण प्रकल्पाला या योजनेतून पाणी मिळण्याच्या आशा आ .राम शिंदे यांच्या मुळे पल्लवित झालेल्या आहेत . .

                          कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेतून मराठवाड्यासाठी आणि विशेषतः बीड जिल्ह्या साठी ५ टीएमसी पाण्याची योजना कार्यान्वित होणार त्याचे काम प्रगतिपथावर आहे . विशेषतः या योजनेद्वारे पुराचे वाहून जाणारे पाणी याचे व्यवस्थापन करणेत येणार आहे त्यामुळे पाण्यासाठी आणि विशेषतः दुष्काळी कर्जत साठी या योजनेतून सध्या असलेल्या सीना धरण प्रकल्पात पाणी सुटले तर सीना धरण प्रकल्प परिसरातील पिण्याचा पाण्याचा व प्रकल्पा खालील सिंचन क्षेत्राचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल . 

कर्जत  मधील काही भाग हा अवर्षण प्रवण भाग आहे सरासरी पर्जन्यमान कमी असते . सीना खोरे हे तुटीचे खोरे आहे त्यामुळे सीना प्रकल्प पूर्ण क्षमतेने ३ ते ४ वर्षातून एखादे वेळेस भरतो त्यामुळे या प्रकल्पा खालील शेतीसाठी नियमित आवर्तने होत नाही परिणामी त्याचा शेती आणि शेतकऱ्यावर खूपच अनिष्ठ परिणाम होतात . या प्रकल्पासाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळावे म्हणून खूप प्रयत्न करणेत आले आहेत पण पुणेकरांच्या पाणी पळवण्याच्या आडमुठ्या पणामुळे कायम स्वरूपी किंवा ओव्हर फ्लोचे पाणी ही मिळत नाही अशी परिस्थिती आहे . . .

            ही वास्तविकता आहे . अशातच

महाराष्ट्राचे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री श्री फडणवीस साहेब यांनी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेला हिरवा कंदिल दाखवत दुष्काळी भागाची तहान कशी भागवता येईल यासाठी प्रयत्न चालवले आहेत . मराठवाडा वॉटर ग्रीड ही देवेन्द्रजींची महत्वाकांक्षी योजना आहे .

                      कृणा भीमा स्थिरीकरण योजनेची पाइप लाइन हि संपूर्णपणे कर्जत तालुक्यातून जात आहे . हि गोष्ट आ . राम शिंदे यांनी अचूकपणे हेरली आणि योजनेचा उपयोग आपल्याही दुष्काळी, अवर्षण प्रवण भागाला व्हावा हि तळमळ आ .राम शिंदे साहेब यांच्या मनात होती . आमदार प्रा .राम शिंदे साहेब हे चाणाक्ष, बुद्धिमान आणि आपल्या भागातील प्रश्ना संदर्भात नेहमीच जागरूक असणारे लोक प्रतिनिधी आहेत . त्यांनी या योजनेचा फायदा आपल्या दुष्काळी भागाला व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे . प्रश्नाची दाहकता आणि वास्तविकता  मांडण्यात आ . राम शिंदे वाक्‌बगार आहेत त्याप्रमाणे त्यांनी प्रश्नांची मांडणी केली आणि त्यांच्या मागणीला यश येत असल्याची शक्यता आहे . . . आ .राम शिंदेच्या पाठपुराव्या मुळे अवर्षण प्रवण भागातील शेतीचा पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी दुष्काळ मिटणार आहे त्या दृष्टीने आज जलसंपदा विभागाने काढलेले आदेश हे त्या दृष्टीने पुढचे पाऊल ठरलेले आहे . . .

               भूमिपुत्र आणि जनतेच्या प्रश्नावर सदैव जागरूक आणि सकारात्मक असणारे आ राम शिंदे यांना कर्जत जामखेड मधील जनता जलदूत , पाणीदार आमदार म्हणत असते ते उगाच नाही . . त्यांच्या सातत्याच्या पाणी प्रश्नाच्या पाठपुराव्या मुळे ते कर्जत जामखेडचे भगीरथ आहेत .अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी दिली आहे . . . .

                     कृष्णा भीमा स्थिरीकरण योजने अंतर्गत पाइपलाइनद्वारे पाणी मराठवाडा विभागाला मिळणार आहे त्यासाठीची योजनेचे काम प्रगती पथावर आहे . त्या प्रकल्पाची सर्व पाइपलाइन कर्जत तालुक्यातून जात आहे त्यामुळे त्यामधून सीना प्रकल्पामध्ये पाणी सुटावे यासाठी जलसंपदा मंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे आता त्यासंदर्भातील स्वयं स्पष्ट अहवाल जलसंपदा विभागाने मागवला आहे . पाणी मिळण्याच्या प्रयत्नात यश मिळणार आहे असा ठाम विश्वास आ .राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे .

Related Post