व्यंकनाथ विद्यालयाचा एसएससी मार्च 20२४ चा 98.91% निकाल.

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२७मे २०२४

      लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च 2024 चा 98.91% निकाल लागला असून; कुमारी काकडे पूर्वा संतोष या विद्यार्थिनीला 93.40% मार्क मिळवून विद्यालयात प्रथम आली. मगर सौरभ सूर्यकांत या विद्यार्थ्याला 92.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांक धावडे गौरव विलास ९१.४० गुण तर चौथा क्रमांक; कुमारी नगरे तृप्ती मच्छिंद्र ९०.४० टक्के गुण पाचवा क्रमांक काकडे प्रज्वल शहाजी हा विद्यार्थी 90.२०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. या एसएससी मार्च 2024 परीक्षेसाठी विद्यालयाचे 92 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ; स्कूल कमिटीचे अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक डीआर काकडे; छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड; स्कूल कमिटीचे सर्व सदस्य विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


     

Related Post