आई वडिलांचे आचरण जगातील सर्वात प्रभावी विद्यापीठ -इंद्रजीत देशमुख

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१९ जाने.२०२५

लिंपणगाव (प्रतिनिधी )लोकनेते,मा.आ.शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापु) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. तृतीय पुष्प गुंफण्याकरता  सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख उपस्थित होते.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे तथा बापू यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयासाठी केलेल्या अपार कष्टाची जाणीव करून दिली.ग्रामीण उन्नतीसाठी निर्माण केलेल्या महाविद्यालयाचा गुणात्मक विकास केला आहे.त्यांनी विद्यार्थी ते प्राचार्य होण्याच्या प्रवासात बापू नाव सर्वोच्च आहे.आपणही घडावे अशी आशा व्यक्त केली.

       व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून इंद्रजीत देशमुख यांनी माणूस म्हणून जगताना यावर प्रेरणादायी व्याख्यान दिले.त्यांनी माणूस म्हणून जगण्याची शाश्वत कारणे सांगून भविष्यासाठी आताच्या पालकांना गाडून घ्यावे लागेल तरच भयमुक्त आयुष्य आपण पाल्यास देऊ अशी अपेक्षा केली.विद्यार्थ्यांनो मानसिक सक्षमता निर्माण करण्यासाठी वाचन करणे खूप गरजेचे आहे.वाचनाने आपल्या धैर्यापासून कोणी विचलित करू शकणार आहे.आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ही सर्वात मोठी प्रेरणा असून आकाश भेदण्याचे सामर्थ्य निर्माण करते 

याचे भान, ज्ञान आणि जान विद्यार्थ्यांनी ठेवावी.प्रमुख वक्त्यांनी वास्तव उदाहरणातून समाज चित्रन मांडले व बिघडलेली समाजस्थितीचे भयावह रूप धोकादायक आहे.त्यासाठी आपली जबाबदारी ओळखून पालकांनी,समाजाने चुकीला चूक मानण्याचे धाडस आणावेच लागेल.येणाऱ्या पिढीला घडवायचे तर चांगुलपणाचा,नीतिमत्तेच्या,विधायकतेचा प्रचार करायलाच पाहिजे.येणाऱ्या पिढीसाठी जगायचे असत.अवघ्यांचे कल्याण करेल तोच खरा माणूस आणि स्व. बापू हे माणूस म्हणून जगले आपणही चांगला माणूस बना अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

      सदर अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे हे होते.त्यांनी बापूंच्या त्यागातून आणि योगदानातून माहिती दिली.बापूंनी त्यांचे सर्व आयुष्य समाज्याच्या कल्याणासाठी घालवले. समाजाच्या सुखासाठी व कल्याणासाठी उभ्या केलेल्या संस्था या आजही बापूंचा वसा वारसा सांगत आहेत.बापूंचे विचार हे आज खूप प्रेरणादायी आहेत. संस्कार, आचरण,चांगुलपणा व साधेपणा खूप शिकवणारा आहे. बापूंच्या प्रेरणामधून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करूया असे मत व्यक्त केले.

      सूत्रसंचालन प्रा.नंदकुमार पवार व प्रा.शंकर गवते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.धर्मनाथ काकडे यांनी केले.

या कार्यक्रमानंतर फनी गेमचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी योगेश भोईटे (संचालक) व सचिन कदम (मा.संचालक) उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

     या व्याख्यानमालेसाठी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड,संचालक विश्वनाथ गिरमकर,धनसिंग पाटील भोईटे,भाऊसाहेब नेटके,लक्ष्मण रायकर,विलास काकडे,योगेश भोईटे,सुरेश रसाळ,तावरे साहेब,पोपटराव बोरुडे,सचिन कदम,प्रशांत गोरे,खेतमाळीस पाटील,ॲड.वाळुंज,सतीश मखरे, प्रवीण शिंदे,गणेश कांबळे,ॲड.सुनील भोस,अमोल नागवडे ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक, बी.के. लगड,बाळासाहेब नलगे,नगरसेवक कोथिंबीरे,रामदास झेंडे,छाया नलगे,प्रसाद भोसले,प्रशांत शिपळकर,राजेंद्र राक्षे; निरीक्षक गोलांडे सर कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, भाऊसाहेब बांदल,आबा काकडे,नागरिक तसेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बंधू,छत्रपती,ज्ञानदीप,तुळजाभवानी  संस्थेतील सर्व सेवक वृंद,प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

चौकोन- 

दरम्यान सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंच्या ९१ व्या जयंती सोहळ्यानिमित्त नागवडे कारखाना स्मृतीकार्यस्थळावर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्यासह कारखान्याच्या आजी-माजी संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

Related Post