संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२५ नोव्हेंबर २०२४
प्रतिनिधी,
तालुक्यातील साखर कारखाने सुरू झाले असून ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रॉलीने करण्यात येते.मागील अनेक वर्षापासून योग्य काळजी न घेतल्याने मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आपण पाहिले आहे.
हे अपघात रोखण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालक यांनी आवश्यक नियमांचे पालन करावे यासाठी संभाजी ब्रिगेड ने ट्रॅक्टर ट्रॉली ने ऊस वाहतूक करणाऱ्यासाठी काही महत्वपूर्ण नियम करण्यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर ट्रॉली यांना रिफ्लेक्टर व इंडिकेटर बसविणे, मोठे आवाज करणारे साउंड सिस्टीम न वापरणे, लायसन्स धारकच चालक असावा तसेच अल्पवयीन व मद्यपी नसावा. याचबरोबर मोकळ्या ट्रॅक्टर ला वेग मर्यादा तसेच रात्रीची वाहतुकीची वेळ निश्चित करण्यात यावी.
अशा प्रकारची वाहतूक नियमावली लागू करण्यात यावी व काटेकोर पालन करण्यात यावे अशा प्रकारची सूचना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याचबरोबर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्पेशल टिम तयार करून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात यावी असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाम भाऊ जरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.