संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१८जुलै २०२४
प्रतिनिधि,
श्रीगोंदा येथे ब्यंकटेश पोदार लर्न स्कुलचा आषाढी वारी दिंडी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर(जोधपूर मारूती चौक) या ठिकाणाहून झाली,त्यासाठी विठ्ठल रुक्मिणी व श्रीगोंदा भूमीतील शेख महंमद महाराज यांच्या प्रतिमा व पादुका पूजन करण्यात आले,पूजेसाठी उपस्थित मान्यवर श्रीगोपाळराब मोटे पाटील.श्री.बंडुकाक दहातॉंडे, संस्थेचे चेअरमन श्री नवनीत मुनोत, व्हा.चेअरमन श्री. अतुल बगाडे व प्राचार्यश्री जितेंद्र वाघमारे सर यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन दांडी सोहळ्यास सुरुवात झाली. संपूर्ण श्रीगोंदा शहरामध्ये प्रदक्षिणा झाली त्यासाठी बगाडे कॉर्नर पासून मांडवगण वेस,कासार गल्ली,झेंडा चौक,रोकडोबा चौक,काळकाई चौक आणि होनराव चौकातून शनी चौक मार्गं महंमद बाबा प्रांगणामध्ये दिंडी सोहळा पोहोचला व शहर प्रदक्षिणा पूर्ण झाली प्रयेक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वारकरी वेशभूषेमध्ये नृत्य व अभंग आणि लेझीम सादरीकरण केले,ठिकठिकाणी शालेय व्यवस्थापनाच्या वतीने सर्व विद्यार्थीं व पालक वर्ग व इतर सांप्रदायिक क्षेत्रातील भाविकांसाठी फराळ व्यवस्था केली होती.सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व विश्वस्त.,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले. सर्वात शेवटी श्री. शेख महंमद बाबा यांच्या प्रांगणामध्ये आषाढी वारी निमित्ताने विविध अभंगवाणी विद्यार्थ्यांनी सादर केली आणि शेवट संत ,गोरा कुंभार यांच्या जीवनपटावरील विठ्ठल भक्तिमय प्रसंगाचे नाट्यमय सादरीकरण ७वी च्या विद्यार्थ्यांनी केले केले.चेअरमन, सरांच्या भाषणामध्ये त्यांनी संतांचे महत्व विशद केले सर्वांचे आभार मानले आणि शेवटी फराळ प्रसाद ग्रहणानंतर दिंडी सोहळयाची दिमाखात सांगता झाली.