नवनियुक्त आमदार अमित गोरखे यांचा विविध संघटनांचे कडून सत्कार ..

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.१८जुलै २०२४

प्रतिनिधी,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणी अभ्यासू युवा व्यक्तिमत्व अमित गोरखे यांची नुकतीच विधान परिषदेवर निवड झाली असून गेली कित्येक वर्षापासून विधान परिषदेवर मातंग समाजाचा अभ्यासू आणि युवा चेहरा आमदार पदावर आरूढ झाल्याने समाजात आनंदाचे उत्साही वातावरण आहे .

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावचे भूमिपुत्र पुण्यात वास्तव्यात असून प्रतिकूल परिस्थितीवर संघर्षमय मात करून राजकीय, शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीने सफल झाले याचा आनंदआणी अभिमान श्रीगोंदेकरांना  असून आमदार पदावर वर्णी लागल्यामुळे आमदार गोरखे यांचा  आधुनिक लहुजी सेना अहमदनगर चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आणि वसुंधरा वृक्ष बचाव आणि संवर्धन संघटना च्या वतीने संतोष गोरखे, अमित काकडे,गणेश खंडागळे आदि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

सत्काराला उत्तर देताना आमदार अमित गोरखे यांनी महायुतीचे आभार मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मातंग समाजाचे नेतृत्व म्हणून माझी केलेली निवड ही माझ्यासाठी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनमोल संधी असून या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही समाजाचे विकसनशील संघटन मजबूत करून मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ, आर्टी आदी बाबींसाठी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधेन अशी ग्वाही आणि विश्वास  आमदार गोरखे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली केला.

Related Post