श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर मनुस्मृती दहन करुन राज्य सरकारचा निःशेष..!

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदा

दि.३१मे २०२४

प्रतिनीधी,

मनुस्मृती मधील काही वाक्यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात घेण्याच्या शालेय शिक्षण मंत्री व राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत संभाजी ब्रिगेड, शिवसेना, राष्ट्रवादी, बसपा व काँग्रेस या मित्र पक्षांकडून घोषणा देत मनुस्मृतीतीचे तहसील कार्यालयासमोर दहन करण्यात आले. 


वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युला कारणीभुत ठरलेल्या मनुस्मृती या पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याचा घेतलेला निर्णय हा पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारा तसेच तमाम संविधान प्रेमी व शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा असुन हा निर्णय त्वरित मागे घ्यावा व समता, बंधुता, न्याय प्रस्तापित करणारी तुकोबांची गाथा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता या ग्रंथांचा समावेश  अभ्यासक्रमात करावा. म्हणजे एक समानताधिष्ठीत पिढी निर्माण होईल. असा विचार यावेळी आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आला. 


     सरकारच्या या चुकीच्या निर्णयाचा निषेध म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृती या ग्रंथाची होळी करुन तहसीलदार मॅडम यांना निर्णय मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.


यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, तालुकाध्यक्ष नाना शिंदे, राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद लगड, संगटक अजीजभाई शेख, शहराध्यक्ष विनोद मेहत्रे, उपाध्यक्ष दिपक साबळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल भैया वाबळे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, शिवसेना तालुकप्रमुख बाळासाहेब दुतारे, बसपा नेते सुनील ओहळ, एकनाथ बरागुजे, जमीलभाई शेख, ओंकार शिंदे आदी उपास्थित होते.

Related Post