संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१९जुलै २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)--पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी डॉ. शिवाजीराव ढगे यांची नियुक्ती संस्थेचे प्रमुख मा. आ. राहुल कुंडलिकराव जगताप यांनी केली. या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रणोती राहुल जगताप ह्या उपस्थित होत्या. डॉ शिवाजीराव ढगे यांनी या प्रसंगी त्बोलताना सांगीतले की संस्थेचा विकास व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीन. गेल्या ५ वर्षात त्यांनी संस्थेच्या सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदाची यशस्वीपणे धुरा सांभाळली. या कालावधीत महाविद्यालयास नॅक ची बी प्लस प्लस ग्रेड मिळाली. प्राचार्य पदाच्या कालावधीत महाविद्यालयाचा झालेला विकास व कायापालट लक्षात घेऊन त्यांची संस्थेच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कुंडलिकराव जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले. नियुक्तीच्या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शांतीलाल घेगडे, रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुठे सर, आयटीआय चे प्राचार्य पंडित सर तसेच संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.