सुभाष राठोड यांच्याकडून कमलादेवी मंदिरास दहा हजार एक रुपये देणगी प्राप्त!

संघर्षनामा वृत्तसेवा। करमाळा

दि.9 फेब्रुवारी 2025

प्रतिनिधी- उज्वला उल्हारे

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपाततील असलेले मुळ मंदिरराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. 

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व  संवर्धन कामस गेल्या  वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन  संवर्धनाचे काम  प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

 शनिवार  दिनांक,०८.०२.२०२५.रोजी रोख देणगी रु.१०,००१/-( रूपये दहा हजार एक फक्त) श्री. संतोष सुभाष राठोड रा. करमाळा यांच्याकडून प्राप्त झालीआहे.  यानिमित्त यांचा सत्कार मंदिर समितीचे विश्वस्त श्री सुशील राठोड, व्यवस्थापक अशोक गाठे, पद्माकर सूर्यपुजारी,यांनी सत्कार केला . या प्रसंगी  राठोड परिवार तसेच भक्तगण उपस्थित होते .

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे .

तसेच ऑनलाईन देणगी ची  सुविधा उपलब्ध आहे .

संपर्क अशोक गाठे. व्यवस्थापक .

मो नं ९४०४७०८९२४.

Related Post