पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून धरणे आंदोलन!

संघर्षनामा वृत्तसेवा l पुणे 

दि.८ फेब्रू.२०२५

प्रतिनिधी,

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने स. नं ४५ ,आळंदी रोड, विश्रांतवाडी ,पुणे १५ या ठिकाणी ओढ्याच्या हद्दीमध्ये आलेली सीमाभिंत मागे घ्यावी.

आरोग्यास धोका असणारा महानगरपालिकेचा मैला शुद्धीकरण केंद्र (JICA प्रकल्प )रद्द करून निर्जन ठिकाणी स्थलांतरित करावा.

प्रभाग क्रमांक तीन मध्ये आयबीएम समोर पावसाळी लाईन मध्ये टाकलेली ड्रेनेज लाईन त्वरित बंद करावी.

वाकडेवाडी येथील मैला शुद्धीकरण केंद्रातील  मैलापाणी शुद्धीकरण न करता डायरेक्ट नदीत सोडलेले मैलापाणी त्वरित बंद करावे.

     या मागण्यांसाठी २५० नागरिकांसह भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. आयुक्तांनी चार दिवसांमध्ये प्रकल्पाला भेट स्वतः देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले.

 शिष्टमंडळामध्ये मा.मंत्री बाळासाहेब शिवरकर, मा.नगरसेवक राजेंद्र शिरसाट, मेहबूब नदाफ ,अश्विनीताई लांडगे ,संतोष आरडे ,राकेश चौरे, विशाल मलके, विल्सन चंदेवळ ,राजू ठोंबरे, अमित कांबळे , विनय माळी, प्रसाद वाघमारे,लक्ष्मीबाई ठोंबरे, शिवानी माने , कैलास गलांडे , रुणेश कांबळे ,गणेश कांबळे ,मिलिंद पंडित, जॉन्सन हिरे ,करीम शेख मकसूद शेख ,लतेश सारंग, सुनील  खरे ,राजपाल घलोत, डॅनियल लांडगे, गोरक्षनाथ अडागळे, डॉ पार्वती साठे,ज्योती बोरकर ,निलांगी नवगिरे मनीषा धेंडे ,अर्चना कांबळे, यशवंत शिर्के आदी प्रमुख सहभागी होते. 

            आंदोलनाचे नेतृत्व येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट व प्रभागाचे अध्यक्ष डॉ रमाकांत साठे यांनी केले.

Related Post